PFI : केंद्र सरकारने पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. या संघटनेचा दहशतवादी संघटनांशी संबध असल्याच्या संशयावरून देशात विविध ठिकाणी या संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर सरकारने या संघटनेवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये पीएफआय संघटनेच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. यामध्ये देशभरातून जवळपास दोनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनतर हा बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पीएफआयवरील बंदीनंतर आता आणखी एका संघटनेवर बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार आता रझा अकादमीवर बंदी आणणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत नवरात्रीनंतर निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे समित ठक्कर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रझा अकादमीवर बंदी आणणार असल्याचे या ट्विटमध्ये लिहिले आहे. ते नवरात्री उत्सवानंतर ही कारवाई करण्यार असल्याचे यात सांगितले आहे.
तसेच उच्च सूत्रांकडून ही माहिती मिळाली असल्याचेही त्यांनी यात सांगितले आहे. समित ठक्कर यांच्या या ट्विटमुळे सगळीकडे चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकार खरंच रझा अकादमीवर कारवाई करणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रझा अकादमी हा एक मुस्लिम कट्टरपंथी इस्लामवादी गट आहे. अल्हाद मोहम्मद सईद नुरी यांनी १९७८ मध्ये रझा अकादमीची स्थापना केली होती. हा गट मुंबईमध्ये स्थित आहे. मात्र, आता रझा अकादमीवर बंदी आणणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
PFI : २०४७ पर्यंत भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा PFI चा प्लॅन; माजी पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
Pune: दूध मांगोगे तो खीर देंगे, भारत मांगोगे तो पाकिस्तान को चिर देंगे; पुण्यात मनसे आक्रमक, काय आहे नेमकं प्रकरण?
raj thackeray : पुण्यात पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राज ठाकरे भडकले; मोदींकडे केली ‘ही’ मागणी
raj thackeray : तुमचा धर्म घेऊन पाकिस्तानात चालते व्हा, ही थेरं आमच्या देशात चालणार नाहीत; राज ठाकरेंनी ठणकावले