खुशखबर! लॉकडाऊन काळातील वीजबिलांसंदर्भात ठाकरे सरकारचा मोठा निर्णय…

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग न घेता अंदाजे वीज बिल काढण्यात आली होती. मात्र वाढीव वीज बिलांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

तसेच वाढीव आलेल्या वीजबिलाच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. ही बाब लक्षात घेत राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.

वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावानुसार राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे.

2019 मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात ग्राहकांना भरायला लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे.

म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 70 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला 70 युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या 30 युनिटचे बिल राज्य सरकार भरणार आहे.

दरम्यान याच पद्धतीने जर वीज वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 50 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.