तळीरामांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रात दारू झाली स्वस्त, एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी घटवली

तळीरामांसाठी ही महत्वाची बातमी आहे. दारूच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. तुम्ही जर दारू पित असाल तर तुम्हाला ही बातमी वाचून नक्कीच आनंद होईल. महाराष्ट्रात दारूच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. पुर्ण महाराष्ट्रात दारूच्या या नवीन किमती लागू होणार आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क १५० टक्क्यांनी कमी केले आहे जेणेकरून दारूची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने ठेवता येईल. इम्पोर्टेड स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आले आहे.

यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढण्याची अपेक्षा असल्याने महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

ड्युटी कमी केल्याने इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसेल, असे ते म्हणाले. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किंमती कमी झाल्या आहेत. या कारणामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासह संपुर्ण देशात सरकारला दारूपासून सगळ्यात जास्त महसूल येतो. महाराष्ट्रात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आल्याने तळीरामांना दिलासा मिळाला आहे. उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात करण्यात आल्याने व्हिस्कीच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे.

आता महाराष्ट्राच्या जनतेला बाकी राज्यांप्रमाणे की किमतीत आयात केलेली स्कॉच मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात एका दिवसात १ लाख बाटल्या विकल्या जातात. दारूवरील शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते. सरकारला यातून बक्कळ महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या
दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढेही झुकली दिल्ली! आंदोलकांच्या मागण्यांना यश
‘शेतकऱ्यांची माफी मागून नरेंद्र मोदींनी दाखवली नम्रता; काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून मोदींचे कौतूक
रेकॉर्ड स्तरापेक्षा 3000 रुपयांनी स्वस्त मिळतय सोनं, जाणून घ्या कुठे मिळतेय ही ऑफर..
इम्रान खान माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी मला खुप प्रेम दिले; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.