विरोधकांपुढे ठाकरे सरकार नमले, सचिन वाझेंबाबत गृहमत्र्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | सध्या मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण खुप तापलेले आहे. ठाकरे सरकारवर या मृत्यु प्रकरणावरून खुप टिका होत आहे. भाजपने राज्य सरकारला वेठीस धरले आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली एक बॅग सापडली होती आणि ती बॅग ज्या गाडीत होती त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन हे होते.

त्यांच्या मृत्युनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात विरोधकांकडून एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांचे नाव सारखे घेतले जात आहे. भाजप आणि मनसेने सचिन वाझे यांच्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे गृहमंत्री अनील देशमुख यांनी विधानपरिषदेत सचिन वाझे यांच्याबद्दल मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की सचिन वाझे यांची लवकरच बदली होणार आहे. निवेदनाच्या सुरूवातील त्यांनी राज्यातील क्राईम रेट सांगितला.

मात्र त्यांच्या निवेदनाच्या वेळी विरोधकांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला आणि सचिन वझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर गृहमंत्री म्हणाले की, निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. पुढे त्यांनी सचिन वझे यांची बदली होणार असल्याची घोषणा केली.

सचिन वाझे यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल. सध्या ते क्राईम ब्रांच येथे कामाला आहेत. त्यांना तेथून हालवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल, असे गृहमंत्री म्हणाले. पण त्यांनी घोषणा केल्यानंतरही विरोधकांकडून त्यांची बदली न करता निलंबन करा अशी मागणी होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
भर पत्रकारपरिषदेत खासदाराने ओढले महिला आमदाराचे गालगुच्चे, पाहा व्हिडीओ 
सचिनने डॉक्टरांसोबत केले प्रॅंक, डॉक्टर इतके घाबरले की…; पाहा व्हिडीओ
अटकेनंतर कुख्यात गुंड गजा मारणेनं चक्क पोलिसांना ठोकला ‘सलाम’, वाचा काय आहे कारण
ही महिला भूतासोबत रोज बनवायची शारीरिक संबंध, आता ‘या’ कारणामुळे करायचे आहे ब्रेकअप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.