राज्य सरकारमधील मंत्र्याची घोषणा! आता राज्यातील लोकांना मिळणार मोफत कोरोना लस

औरंगाबाद । सध्या बिहार निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नुकताच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मोफत कोरोना लसीचे वाटत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

यावर आता टीका होऊ लागली आहे. विरोधक आता टीका करत आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे.

भाजप निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. यावरून आता राजकारण तापले आहे.

बिहारमधील निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यातून भाजपने सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

आता महाराष्ट्रात देखील ही लस मोफत मिळणार असल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता केंद्रावर आपल्याला अवलंबून राहावे लागणार नाही. नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.