ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई : ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे शासकीय सदस्य सहभागी झाले होते.

दरम्यान, निवडीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले. कविवर्य सुरेश भट यांनी लिहिलेली ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’ आणि आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.

राज्य सरकारकडून १९९६ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिला पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. तर, दुसरा पुरस्कार १९९७ मध्ये गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना देण्यात आला होता.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळविणाऱ्या आशाताई, मंगेशकर घराण्यातील दुसऱ्या व्यक्ती आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या 

शेतकऱ्याचा नादच नाय! पारनेरच्या या शेतकऱ्याने तैवान पिंक पेरू शेतीतून केली ४० लाखांची कमाई

…अन् तहसीलदाराने गॅसवर जाळले तब्बल 20 लाख रूपये; कारण वाचून धक्का बसेल

“नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना काय चीज आहे, ते दाखवून देऊ”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.