Maharahstra Local Body Election: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Local Body Election) अखेर निश्चित होत्या त्याच वेळेत होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्टपणे सांगितले आहे. निवडणुका स्थगित करण्याची मागणी फेटाळत न्यायालयाने राज्यातील 288 नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या निवडणुकांना पूर्ण मोकळा मार्ग दिला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) न्यायालयात माहिती दिली होती की 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. या घडामोडीत आज कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, मनपा (Municipal Corporation), जिल्हा परिषद (ZP), पंचायत समिती (PS) यांच्या निवडणुकांना कोणताही विलंब होऊ नये. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मर्यादा 50% पेक्षा जास्त आहे, त्या निवडणुका कोर्टाच्या आदेशाधीन राहतील. पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर होईल. 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती—एकूण 288 निवडणुका जाहीर कार्यक्रमानुसारच होतील. “कोणत्याही निवडणुकीस स्थगिती नाही.” बांठिया आयोगाचा अहवाल कोर्टाने न वाचल्याचे सांगितले, मात्र सध्या त्यालाच आधार मानण्यात येत असल्याचेही नमूद केले. “मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यात 50% पेक्षा अधिक आरक्षण लागू होऊ शकत नाही.”
निवडणूक आयोगाने (Election Commission) 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशात सुधारणा केली असून, मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजता प्रचार संपेल. मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025, त्यामुळे प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रात्री 10 वाजता होईल.






