युपीच्या मंदीरातील महंत बरळले; ‘कलाम जिहादी, त्यांनीच अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली’

अलीगढ | उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमधील एका मंदिराच्या महंताने भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

काही दिवसांपुर्वी गाझियाबादमधील डासना देवीच्या मंदिरात एक १४ वर्षाचा मुस्लीम समाजातील मुलगा पाणी पिण्यासाठी गेला होता. त्याला त्यानंतर जबर मारहाण करण्यात आली होती. याच मंदिराचे पुजारी असलेले नरसिंहानंद यांनी मुस्लीम समाज आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

“अब्दुल कलाम हे डीआरडोचे प्रमुख असताना त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली होती. तसेच राष्ट्रपती भवनात कलाम यांनी एक विभाग तयार केला होता. त्या विभागात मुस्लीम व्यक्ती तक्रार दाखल करू शकतो. अब्दुल कलाम जिहादी होते.” असं नरसिंहानंदांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, “देशातील प्रतिष्ठीत कुटूंबातील कोणताच मुस्लीम व्यक्ती भारत समर्थक असू शकत नाही. असं वादग्रस्त वक्तव्य महंत नरसिंहानंद सरस्वती यांनी केलं आहे.

दरम्यान भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. अब्दुल कलाम नेहमी तरूण वर्गाला प्रेरित करत होते. जीवनात पुढे जाण्यासाठी कलाम युवावर्गाला नेहमी मार्गदर्शन करत होते.

भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलामांनी शपथ घेतली होती. कलाम यांनी इंडिया माय ड्रीम, विंग्ज ऑफ फायर, इंडिया २०२०, टर्निंग पॉइंट्स, दीपस्तंभ यासारखी अनेक पुस्तके लिहिली आहेत. भारताने त्यांना १९९७ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले होते.

महत्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांनी भाई जगतापांना थेट पुराव्यासहीत खडसावलं..
मोदी सरकारच्या या योजनेमुळे एप्रिलपासून तुमचा पगार कमी होण्याची शक्यता
राज्यात सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात पाठवू; अमित शहांची मुख्यमंत्र्यांना थेट धमकी
कृणाल पांड्याची पहील्याच सामन्यात ३१ चेंडूत ५८ धावांची धडाकेबाज खेळी; बापाच्या आठवणीत भर मैदानात रडला..
१८ वर्षाच्या पोराने तयार केली भंगारापासून भन्नाट कार लोकांनी केली एलॉन मस्कशी तुलना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.