Homeताज्या बातम्यामहादेवाच्या कृपेने मोदी वाचले, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने त्यांची हत्या झाली असती;...

महादेवाच्या कृपेने मोदी वाचले, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने त्यांची हत्या झाली असती; बड्या भाजप नेत्याचं वक्तव्य

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाने चौकशी करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळी केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक पंजाबमध्ये या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारकडे सविस्तर अहवाल मागितला आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या त्रुटींवरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंजाब राज्याच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्याही होऊ शकली असती, अशी भीती केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली आहे. या घटनेवरून गिरीराज सिंह यांनी एक ट्विट केले आहे.

“पंतप्रधानांना मृत्युच्या विहिरीत ढकलणं हा काही योगायोग नव्हता… महादेवाच्या कृपेने ते वाचले”, असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. “या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली तर हे षडयंत्र पंजाबचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यालयापर्यंत मर्यादित राहत नाही. त्याच्यावर देखील या प्रकरणाचे धागदोरे सापडतील. पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींची हत्या ड्रोनने किंवा टेलिस्कोपिक गनने केली गेली असती”, अशी शक्यता गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली आहे.

“जी घटना पंतप्रधानांसोबत घडली तो काही योगायोग नव्हता. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता किती आहे हे संपूर्ण जगाला माहित आहे. ही घटना देशाच्या पंतप्रधानांसोबत नाही, तर संपूर्ण देशासोबत घडली आहे. ज्यांनी स्वतः षडयंत्र रचलं ते काय तपास करणार?”, असा सवाल केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे.

भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेची दखल घेतली. त्यांनी सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना सापडणारे पुरावे आणि नोंदी सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केली आहे.

या प्रकरणात छत्तीसगडच्या भाजप आणि केंद्रावर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे वर्षभरापासून आंदोलन सुरू होते. शेतकरी पंतप्रधान मोदींवर नाराज आहे, हे सर्वश्रृत आहे. पंतप्रधान मोदींच्या नियोजित सभेला ५०० जणही आले नव्हते. या प्रकरणावर पंतप्रधान मोदी जे म्हणाले. ते नाटक नाही तर काय आहे?”, असा सवाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ ५ शेअर्सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका वर्षात दिला २८१% परतावा
बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम
बर्फाच्या वादळातही न डगमगता उभा आहे भारतमातेचा जवान, व्हिडिओ पाहून तुम्हीही ठोकाल सलाम