Share

पुण्यात मनसेची महाआरती, वसंत मोरेंची नाराजी दूर; शहराध्यक्षांचाही पोलिसांना इशारा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यावरून राजकारण तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakare) यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. या कारवाईवरून राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती.(Maha Aarti of MNS in Pune, Vasant More’s displeasure removed)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर येणार आहे. राज ठाकरेंचा पुणे दौरा तीन दिवसांचा असणार आहे. या तीन दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यातील मनसेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. मनसेचे नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस प्रत्यक्ष मैदानात उतरले आहेत.

आज सायंकाळी मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या वसंत मोरे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या कात्रज भागातील ऑफिससमोर असणाऱ्या हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मंदिराबाहेर स्टेज देखील उभारण्यात आला आहे.

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या महाआरतीच्या संदर्भात माहिती दिली आहे. या महाआरतीच्या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. “आज महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मी तीन दिवस तिरुपती बालाजीला होतो. त्यामुळे महाआरतीचे नियोजन झाले नव्हते. आज महाआरती होणार आहे. या महाआरतीला पोलिसांची देखील परवानगी मिळाली आहे”, असे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले आहे.

वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या महाआरतीच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी देखील पुण्यातील अनधिकृत भोंग्यांविरोधात आवाज उठवला आहे. पोलिसांनी पुणे शहरातील अनधिकृत भोंगे लवकरात-लवकर उतरवावेत, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा म्हणू, अशी भूमिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी घेतली आहे.

यासंदर्भात पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस, मनसे प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे आणि बाळा शेडगे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. तसेच पोलीस आयुक्तांना याबाबत एक निवेदन देखील देण्यात आलं आहे. पुणे शहरातील अनधिकृत भोंगे तातडीने उतरवावेत, अशी मागणी या निवेदनातून मनसेने केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावला, मुंबई पोलिसांनी केली कठोर कारवाई
मुंबईने सामना जिंकल्यानंतर टिम डेव्हिड जे बोलला, ते ऐकून तुम्ही सुद्धा म्हणाल, रोहित शर्मा चुकलाच
साऊथनंतर आता हॉलिवूडचा धुमाकूळ, Dr. Strange 2 ने पहिल्याच दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now