magical hug : ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या बॉलिवूड चित्रपटातील जादू की झप्पीचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. एखाद्याला प्रेमाने मिठी मारली तर मनाला शांती मिळते, असा समज आहे. मात्र, असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने महिलेला इतक्या जोरात मिठी मारली की तिच्या छातीच्या हाडे तुटली.
होय, हे प्रकरण चीनचे असून चिनी महिलेने तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आहे. तिच्या सहकाऱ्याने तिला खूप घट्ट मिठी मारली आणि तिच्या छातीच्या तीन बरगड्या तुटल्या. महिलेने सहकाऱ्याला युंक्सी कोर्टात नेले आणि सांगितले की मिठी मारल्याने बरगडी तुटली म्हणून त्याच्या उपचारासाठी खर्च झालेल्या पैशाची भरपाई मागितली.
वृत्तानुसार, हा अपघात मे 2021 मध्ये झाला होता. चीनच्या हुनान प्रांतातील युयांग शहरातील एक महिला तिच्या कामाच्या ठिकाणी एका सहकाऱ्यासोबत गप्पा मारत असताना एक पुरुष सहकारी तिच्याकडे आला आणि तिला घट्ट मिठी मारली. मिठी मारल्यानंतर महिलेला वेदना होत होत्या.
काम केल्यानंतर तिला छातीत दुखत होते. डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तिने छातीवर गरम तेल लावले आणि झोपी गेली. पाच दिवसांनी छातीत दुखू लागल्याने ती महिला रुग्णालयात गेली. एक्स-रे स्कॅननुसार, महिलेच्या तीन तुटलेल्या बरगड्या होत्या, त्यापैकी दोन तिच्या उजव्या बाजूला आणि एक डावीकडे होती.
नोकरीवरून अनुपस्थित राहून रजा घेण्यास भाग पाडल्याने तिचे पैसेही बुडाले. तिला नर्सिंग सेवा आणि वैद्यकीय खर्च देखील द्यावा लागला. बरी झाल्यानंतर ती त्या व्यक्तीकडे गेली ज्याने तिची बरगडी मोडली होती. त्याने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो व्यक्ती म्हणाला की, तुझ्याकडे कोणते पुरावे नाही कि बरगडी मी मिठी मारली म्हणून तुटली
काही काळानंतर, त्या महिलेने तिच्या सहकाऱ्यावर खटला दाखल केला आणि आर्थिक नुकसान भरपाईची विनंती केली. न्यायमूर्तींनी सहकाऱ्याला 10,000 युआन म्हणजेच 1.16 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने सांगितले की, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही कि त्या पाच दिवसांत महिलेने अशा कोणत्याही कृतीत भाग घेतला होता, ज्यामुळे फ्रॅक्चर होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
R Madhavan : आता आम्हाला आमचे चित्रपट.., आर माधवनने सांगितले लाल सिंग चड्ढा फ्लॉप होण्यामागचे कारण
Karan Johar : आमिरच्या चित्रपटाचे हाल पाहून करण जोहरची टरकली, इमोशनल पोस्ट शेअर करत म्हणाला..
Bollywood: सलमान खानची अभिनेत्री ईडीच्या जाळ्यात; तब्बल २०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीने केले आरोपी