उंदीरमामा लई भारी! या उंदीराने वाचवला आहे हजारो लोकांचा जीव, वाचा कसा

 

आपण अनेकदा लोकांना त्यांच्या कामगिरीबद्दल देशाकडून शौर्य पुरस्कार देताना बघतो. अनेकदा खुप वय असणाऱ्या मुलांनाही हा पुरस्कार मिळालेला आपण बघितला असेल, पण तुम्ही कधी उंदीराला शौर्य पुरस्कार मिळाला असे कधी ऐकले आहे का? तुम्हाला खरं वाटत नसेल पण हे खरं आहे.

ब्रिटनच्या एका संस्थेने चक्क एका उंदीराला शौर्य पुरस्कार दिला आहे. १.२ किलो वजन असणाऱ्या उंदीराच्या भन्नाट कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कारासोबत त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

आफ्रिकेत आढळणाऱ्या या उंदीराचे नाव मागावा असे आहे. हा उंदीर मामा सात वर्षांचा असून त्याने आतापर्यंत हजारो लोकांचे जीव वाचवले आहे. कंबोडीयामध्ये या उंदीराने त्याच्या वास घेण्याच्या क्षमतेने तब्बल ३९ भुसुरुंग शोधून काढले आहे. तसेच त्याने २८ जिवंत स्फोटक शोधून हजारो लोकांचे जीव वाचवले आहे.

त्याच्या या कामगिरीबद्दल ब्रिटनमधली चॅरीटी संस्था पीडीएसने त्याला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले आहे. उंदीराला एपीओपीओ या संस्थेने हे सर्व शोधण्याचे प्रशिक्षण दिले होते.

या उंदीराने कंबोडीयामध्ये २० फुटबॉल मैदान एवढे क्षेत्रफळ असणाऱ्या भागातून स्फोटके आणि भुसुरुंग शोधून काढली आहे. त्याचे वजन कमी असल्याने तो भुसुरुंगात जरी असला तरी त्याच्या वजनामुळे स्फोट होत नाही.

मागावा त्याला दिलेल्या प्रशिक्षणात इतका माहीर आहे की फक्त ३० मिनिटांत टेनिस कॉर्ट एवढ्या भागातून तो स्फोटके शोधू शकतो. विशेष म्हणजे बॉम्ब डिटेक्टरपेक्षाही कमी वेळात तो स्फोटके शोधून काढतो.

भुसुरुंगामुळे १९७९ पासून आतापर्यंत ६४ हजार लोकांना आपला जीव गमावला आहे. ब्रिटीशची पीडीएसए दरवर्षी प्राण्यांना सन्मानित करत असते, पण यंदा त्यांनी पहिल्यांदाच एका उंदीराला सन्मानित केले आहे.

मागावाला ज्या संस्थेने प्रशिक्षण दिले आहे, ही संस्था अफ्रिका खंडातील टांझनिमध्ले काम करते. १९९० पासून ही संस्था वेगवेगळ्या उंदीरांना प्रशक्षिण देण्याचे काम करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.