माज किती आहे बघा, मुलासोबतच्या शाहरुख खानच्या व्हिडीओवर नेटकरी संतापले

मुंबई । बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान सतत चर्चेत असतो. त्याने आजपर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. त्याचे अनेक चित्रपट हे करोडोंची कमाई करतात. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा एकही आला नाही यातच लॉकडाऊनमुळे सर्वकाही बंद होते. मात्र त्याची लोकप्रियता कमी होत नाही. त्याचे जगभरात चाहते आहेत.

आता शाहरूखचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. त्याला एका बिल्डिंगमधून बाहेर पडताना स्पॉट करण्यात आले. बाहेर मीडिया त्याच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करत होती. काहीतरी प्रतिक्रिया मिळेल असे सगळ्यांना वाटत होते, मात्र ती मिळाली नाही.

त्याने काळ्या रंगाचा हूडी परिधान करुन थेट त्याच्या गाडीत जात असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळाले. तसंच त्याचा मुलगा आर्यनला देखील एका रेस्टॉरंटमध्ये जाताना स्पॉट करण्यात आले होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावरून मात्र त्याला ट्रोल केले जात आहे. व्हिडीओवर एका युजरने म्हटले की, इतका भाव खाणाऱ्या अभिनेत्याला मीडिया का महत्व देते? दुसऱ्या युजरने लिहिले, “माज किती आहे बघा, तर चौथ्या युजरने शाहरुख चेहरा का लपवत आहे?” असा प्रश्न विचारला आहे. अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुखला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत. शाहरुख सिद्धार्थ निगम दिग्दर्शित ‘पठाण’ या चित्रपटवर काम करत आहे. अद्याप निर्मात्यांकडून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी पुढील वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशा चर्चा आहेत.

यामध्ये शाहरुखसोबत दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत आहेत. यामुळे याची उत्सुकता लागली आहे. मात्र या व्हिडिओमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक दिवसानंतर तो बाहेर पडला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.