आरारारारा! बाॅलीवूडची ‘ही’ स्टार अभिनेत्री म्हणतेय मला भूताने झपाटलय

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. मदालसाने हॅलोवीनच्या निमित्ताने खूप व्हिडिओज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये मदालसा कुठेही जाते तेव्हा तिला तिथे भूत नजरेस पडत असल्याचे दिसत आहे.

तसेच हे व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. मदालसाने या व्हिडीओ सोबत ‘हॅपी हॅलोवीन’ असा कॅप्शन दिला आहे. मदालसाने या व्हिडीओसोबत ‘जेव्हा तुम्ही जास्त हॉरर मुव्हीज पाहता तेव्हा तुमचे असे हाल होतात. हॉरर फिल्म्स मध्ये दिसणारा मायकल मेयर्स हा माझ्या आवडता आहे’, असा कॅप्शन दिला आहे.

https://www.instagram.com/reel/CHAhLTypBcX/?igshid=aa2utwo5btpj

मदलसा शर्मा ही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ती विशेष प्रसंगी व्हिडिओ पोस्ट करत असते. आता हॅलोविनच्या निमित्ताने तिने बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ती जिथे जिथे जाते तिथे तिला भीतीदायक गोष्टी दिसू लागतात.

मदालसा शर्मा टीव्ही शो अनुपमा काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी मदालसाला वाहवा मिळत आहे. या शोच्या माध्यमातून तिची फॅन फॉलोईंग देखील वाढत आहे. मदालसाने २००९ मध्ये तेलगू चित्रपट ‘फिटिंग’ यामधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तसेच तिने कन्नड चित्रपट ‘शौर्य’ यामध्ये काम केले आहे. मदालसा शर्मा आणि निमोह चक्रवर्ती यांचा विवाह जुलै २०१८ मध्ये झाला होता.

आमिर खानच्या मुलीचा धक्कादायक खुलासा; १४ व्या वर्षी माझ्यावर लैं गिक अ त्याचार झाले होते

…म्हणून सैफ अली खानला लग्नाआधी करीनाने दिला होता दोनदा नकार 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.