मध्य प्रदेशातील(Madhya Pradesh) श्योपूर जिल्ह्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आहे. नदीत आंघोळीसाठी गेलेल्या एका मुलाला मगरीने गिळंकृत केल्याचा संशय ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी मगरीला नदीतून बाहेर काढत ओलिस ठेवले. या घटनेची माहिती मिळताच वन्य विभागाचे अधिकारी तातडीने त्या ठिकाणी पोहचले.(Madhyapradesh ritoja village crocodile video viral)
वन्य विभागाचच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मगरीला सोडण्याची विनंती केली. पण ग्रामस्थांनी नकार दिला. मगरीच्या पोटामधून मुलाला बाहेर काढेपर्यंत मगरीला सोडणार नाही, अशी भूमिका गावातील नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. हा सर्व प्रकार श्योपूर जिल्ह्यातील रिजेता गावात घडला. या घटनेची सध्या आसपासच्या परिसरात चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिजेता गावात सात वर्षांचा मुलगा अतार सिंग नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. नदीत आंघोळ करत असताना मगरीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ओढून नदीत नेले. यावेळी गावातील काही लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. या लोकांनी असा दावा केला की मगरीने त्या मुलाला जिवंत गिळले.
https://twitter.com/SatyaVijaySin20/status/1546584321590382592?s=20&t=ExYxQL8DyyIkzaNs7SWtxg
या घटनेची माहिती मिळताच गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी मगरीला नदीतून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी जाळ्याचा वापर करत मगरीला नदीतून बाहेर काढले. त्यानंतर ग्रामस्थांनी मगरीला बांधून ठेवले. मगरीच्या पोटामधून मूल बाहेर येईल, असे ग्रामस्थांना वाटत होते. दिवसभर ग्रामस्थांनी मगरीला पकडून ठेवले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आणि वन्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला सोडण्याची ग्रामस्थांना विनंती केली. पोलिसांनी समजूत घातल्यानंतर ग्रामस्थांनी मगरीला सोडून दिले. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी त्या मुलाचा मृतदेह नदीत आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथकाकडून नदीत मुलाचा शोध घेण्यात येत होता. सायंकाळी उशिरापर्यंत बचाव पथकाला नदीत काहीही सापडले नव्हते. त्यामुळे सायंकाळी मदतकार्य थांबवण्यात आले. सकाळी पुन्हा शोध सुरू केला असता त्या मुलाचा मृतदेह नदीत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
MIM च्या नेत्यांनी कबूल करावं की औरंगजेब त्यांचा बाप आहे, शिवसेनेची जहरी टीका
आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या मुंबईची आदित्यसेनेने गटारगंगा केली, नितेश राणेंची बोचरी टीका
‘शिवसेनेचा पाठिंबा हवा असल्यास भाजपने मातोश्रीवर यायला हवे’, उद्धव ठाकरेंची अपेक्षा