Share

पत्नी खुप सुंदर आहे, तिला माझ्यासोबत नाही राहायचं; लग्नानंतर तीन दिवसातच पतीने उचलले मोठे पाऊल

husband-uttar.j

मध्य प्रदेशमधून(Madhy Pradesh) एक विचित्र घटना समोर आली आहे. साधारणपणे प्रत्येक मुलाला सुशिक्षित आणि सुंदर बायको हवी असते. पण काही वेळा पत्नीचे सौंदर्य पतीसाठी डोकेदुखी ठरते. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. छतरपूर जिल्ह्यातील मातोंड गावात राहणाऱ्या नंदूच्या(Nandu) बाबतीत ही घटना घडली आहे.(madhy pradesh incident husband file fir aganist wife and her family)

३० एप्रिल रोजी रीना आणि नंदूचं मोठ्या थाटात लग्न झालं होत. नंदूची पत्नी रीना दिसायला खूपच सुंदर आणि उच्च शिक्षित आहे. लग्नानंतर रीना तिच्या माहेरच्या घरी गेली. पण त्यानंतर रीना सासरी आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रीनाचा पती(Husband) नंदू तिला आणण्यासाठी तिच्या घरी गेला. पण तिने परत येण्यास नकार दिला.

पती सुंदर नसल्याचे कारण देत रीनाने परत येण्यास नकार दिला. याउलट रीनाच्या कुटुंबीयांनी नंदूला खोलीत डांबून मारहाण केली. याप्रकरणात नंदू पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास गेले. पण त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल केली नाही. नंदूला आता पोलिस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.

लग्नात नंदूने पत्नीला शक्य तितके दागिने देऊ केले होते. माझी पत्नी दिसायला खूप सुंदर, हुशार आणि शिकलेली आहे. मी माझ्या पत्नीप्रमाणे सुंदर आणि हुशार नाही, असे नंदूने सांगितले. लग्नानंतर रीना पतीसोबत फक्त तीन दिवस राहिली. यानंतर रीना तिच्या माहेरी गेली आणि तिने सासरी परतण्यास नकार दिला.

बुधवारी नंदू पाल हे पत्नीला घेण्यासाठी सासरच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी सासरच्यांनी नंदू यांना बेदम मारहाण केली. या घटनेननंतर व्यथित झालेल्या नंदू पाल यांनी छतरपूरच्या एसपी कार्यालयात जाऊन न्यायाची याचना केली आहे. मला माझी पत्नी परत मिळवून द्यावी, अशी मागणी नंदू पाल यांनी पोलिसांकडे केली आहे.

पत्नीला परत मिळवून देण्यासोबतच तिच्या सासरच्यांवरही कारवाई करण्याची मागणी नंदू पाल यांनी केली आहे. पत्नी सुंदर आहे याचा अर्थ असा नाही की तिने आपल्या पतीला सोडावे, असे नंदू पाल यांनी सांगितले आहे. नंदू पाल यांच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण छतरपूर जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. या घटनेमुळे नागरिक देखील चक्रावले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
टपाटप! अखेर हिंदुस्तानी भाऊला मिळाला जामीन, पण ‘या’ आहेत अटी
दुर्दैवी! हळदी समारंभाला आलेल्या १३ महिलांचा विहिरीत पडून मृत्यू, लग्नमंडपात पसरली शोककळा
”माझे आव्हान पूर्ण करण्याची हिम्मत अमोल कोल्हेंच्यात नाही, त्यांना वाटतंय त्यांनी शब्द पुर्ण केला”

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now