माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट, धकधक गर्लच्या दिलखेच अदा पाहून चाहते घायाळ

मुंबई |  बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिच्या सौदर्याच्या बाबतीत कोणीही टक्कर देऊ शकत नाही. वयाच्या ५३ व्या वर्षांतही तिचे अनेक चाहते आहेत. माधुरीने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितची ओळख धकधक गर्ल म्हणून आहे. तिच्या फॅशन सेन्सचे लाखो चाहते आहेत. माधुरीच्या फोटोशूटने अनेक चाहत्यांना यापुर्वी घायाळ केले आहे. यावेळीही तिने असाच नवा फोटोशूट केला आहे.

धकधक गर्ल माधुरीने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे. तिने हे फोटो आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये माधुरीचे सौंदर्य आणखीच खूलले आहे.

माधुरी नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहते. परंतु यावेळी समोर आलेल्या फोटोंची माधुरीच्या चाहत्यांमध्ये विशेष चर्चा आहे. हे फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

माधुरीने शेअर केलेल्या फोटोंना ३ लाखांच्या जवळपास लाइक्स आहेत. यावरून माधुरीच्या मोहक सौदर्यांची चाहत्यांमध्ये आजही क्रेझ कायम असल्याचे दिसते.

महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेता अंकूश चौधरीची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री; पहा फोटो
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल होते राजकूमार; पण तिने मात्र लग्नाला दिला होता नकार
प्रेग्नेंसीनंतरचा सपना चौधरीच्या डान्सचा ‘तो’ खतरनाक एकदा व्हिडीओ पहाच.. 
पेट्रोलच्या वाढत्या दरापासून आता होईल सुटका, भारतात लॉन्च झाली इलेक्ट्रिक सायकल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.