५० वर्षीय माधूरीच्या फोटोशुटने चाहत्यांना लावलय वेड! जान्हवी, सारा यापुढे फिक्या पडतील

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील अभिनेत्री असूनही ती तेव्हा जितकी सुंदर होती तितकीच आजही सुंदर आहे. तिची अदा आणि तिचे मनसोहक रुप किंचितही कमी झालेले नाही. नुकतेच माधूरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूप सुंदर दिसत आहे.

माधूरीने फोटोला दिलेल्या कॅप्शननेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फूल माँगू ना बहार माँगू मैं तो सनम तेरा प्यार माँगू, असे कॅप्शन तिने दिले आहे. सध्या माधूरीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये माधुरी दीक्षितने सुंदर निळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. साडीच्या सुंदर फोटोंमध्ये ती एकदम फिट दिसते. माधुरी दीक्षित अनेक वर्षांपासून देशाची ब्यूटी आयकॉन आहेत. माधुरीचे स्मित हास्यही प्रत्येकाचे मन जिंकून घेते. तिचा डान्स अजूनही तिच्या चाहत्यांना वेड लावतो.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये माधूरीने शिमरी साडी परिधान केलेली दिसत आहे. तिने यामध्ये आपले केस बांधले आहेत. यावेळी माधूरीने हलका मेकअपही केला आहे. तिच्या झुमक्यांनीही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. उफ्फ तेरी अदा,,, अशी कमेंट माधूरीच्या एका चाहत्याने केली आहे.

सध्या माधुरी दीक्षित डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ३ मध्ये जज म्हणून दिसत आहे. तिच्याकडे नेटफ्लिक्सचा पुढचा प्रोजेक्ट अनामिका आहे. शोचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री अनामिकाचे शूटिंग सुरू करणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

ओझे नाही, तर कुटुंबासाठी अभिमान आहे या पाच मुली, पाचही बहिणी गरीब कुटुंबातून झाल्या अधिकारी
“अहो पाटील, तुम्ही काय अजित पवार खिशात ठेवण्याची भाषा करताय? तुमचे १०५ अजितदादांनी गुंडाळलेत”
मोहन भागवत यांनी एकाच वाक्यात सांगितली हिंदुत्वाची व्याख्या, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.