माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…

 माधुरी दिक्षित ९० च्या दशकातील बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांना बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखले जाते. पण त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नाही.

त्यांना यासाठी खुप जास्त मेहनत करावी लागली होती. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला होता. तेव्हा त्यांच्या घरच्यांची त्यांनी लग्न करून संसार करावा अशी इच्छा होती.

सिनेमांत काम करण्यापेक्षा माधुरीने लग्न करून संसार करावा. अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. म्हणून माधुरीसाठी वर शोधण्याचे काम त्यांनी सुरु केले होते.

एकीकडे माधुरीला सिनेमांमध्ये काम करण्याची स्वप्न पडत होती. तर दुसरीकडे त्यांचे आई- बाबा मात्र त्यांच्यासाठी मुले शोधत होते. त्यांनी अनेक मुले बघितली होती.

याचदरम्यान, माधुरीच्या वडिलांनी दिग्गज गायक सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला. माधुरीच्या आई- वडिलांनी सुरेश यांना मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला.

पण सुरेश वाडकर यांनी या स्थळाला थेट नकार दिला. कारण काय तर माधुरी फार सडपातळ असल्याचे कारण त्यांनी दिले होते. या नकाराने माधुरीच्या आई- वडिलांना प्रचंड दु:ख झाले होते.

एक चांगले स्थळ हातचे गेले. असेच इतर आईवडिलांप्रमाणे त्यांना वाटत होते. पण या नकाराने माधुरीचा मात्र फायदा झाला. कारण यानंतर तिच्या आई- वडिलांनी तिला सिनेमात काम करण्याची परवानगी दिली.

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ साली कोल्हापुरात झाला होता. हिंदी, मराठीसोबतच भोजपुरी, कोकणी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांत आणि उर्दू भाषेतूनही त्यांनी गाणी गायली आहेत.

सुरेश वाडकर यांनी नकार दिला. त्यांनतर माधुरी दिक्षितने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेजाब, बेटा, हम आपके है कोन, अंजाम, कोयला, हे तिचे काही सुपरहिट चित्रपट आहेत.

महत्वाच्या बातम्या-
माधुरी दिक्षीतचे मेकअपशिवायचे फोटो पाहीले आहेत का? ओळखू सुद्धा येणार नाही; पहा फोटो..
उसाच्या फडातला ‘तो’ डान्सचा व्हिडिओ सोशल मिडीयावर होतोय व्हायरल; माधुरीकडून वाहवा
त्या कलाकारावर आलीये आता रिक्षा चालवण्याची वेळ, एकेकाळी माधुरी दीक्षितसोबत केले होते काम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.