व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी

९० च्या दशकामध्ये आपल्या सुंदरतेने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे माधूरी दिक्षित. माधूरीने अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये राज्य केले आहे. ती बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होती. आज व्हॅलेंटाईन दिवशी आम्ही तुम्हाला माधूरी दिक्षितची प्रेम कहाणी सांगणार आहोत.

माधूरीने ‘अबोध’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर माधूरीला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे कठिण झाले होते. पण तिने हार मानली नाही. ती चित्रपटांसाठी प्रयत्न करत होती. या कालावधीमध्ये तिला ‘तेजाब’ चित्रपटाची ऑफर आली.

‘तेजाब’ चित्रपट सुपरहिट झाला आणि माधूरी रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर माधूरीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. तिने अनेक हिट चित्रपट केले आणि ती बॉलीवूडची सुपरस्टार झाली. माधूरीला बॉलीवूडची लेडी अमिताभ बच्चन बोलले जात होते.

माधूरीने तेजाब, बेटा, परींदा, कोयला, अंजाम, हम तुम्हारे हे सनम, देवदास, हम आपके है कौन, दिल तो पागल है अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. फक्त माधूरीच्या नावाने चित्रपट हिट व्हायचे. करिअरच्या टॉपवर असताना माधूरीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

१९९८ मध्ये माधूरीने डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले. लग्नानंतर माधूरी अमेरिकेला स्थायित झाली. तिचे लग्न इंडस्ट्रीसाठी खुप मोठा धक्का होता. पण तिला फरक पडला नाही. ती लग्नानंतर नवऱ्यासोबत सुखी संसारात व्यस्त झाली.

माधूरी आणि श्रीरामची पहीली भेट एका पार्टीमध्ये झाली होती. दोघांची भेट झाली त्यावेळी श्रीराम नेनेला माहीती नव्हते की माधूरी अभिनेत्री आहे. ती बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करते. ही गोष्ट माहीती नसल्यामूळे त्यांनी माधूरीला एका सामान्य मुलीप्रमाणे वागवले. ही गोष्ट माधूरीला खुप आवडली.

पहील्या भेटीनंतर माधूरी आणि श्रीराम एका डोंगरावर बाईक रायडिंगसाठी गेले होते. माधूरीसाठी हे सगळं खुप नवीन होते. त्यामूळे दोघांमध्ये खुप चांगली मैत्री झाली. माधूरीला श्रीराम नेनेंचा स्वभाव खुप आवडला. त्यामूळे दोघे अनेक वेळा भेटू लागले.

श्रीरामला ज्यावेळी समजले की, माधूरी अभिनेत्री आहे. ती बॉलीवूडची सर्वात मोठी स्टार आहे. हा त्यांच्यासाठी खुप मोठा धक्का होता. कारण माधूरीमध्ये स्टारसारखे कोणतेही नखरे नव्हते. ती अतिशय शांत आणि प्रेमळ होती. दोघेही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

माधूरीला एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आले होते की, तिने करिअरच्या टॉपवर असताना लग्न करण्याचा निर्णय का घेतला? त्यावर माधूरी म्हणाली होती की, ‘मी त्यावेळी प्रेमात होते. मी माणसाच्या प्रेमात पडले होते जो फक्त माधूरीला ओळखतो सुपरस्टार माधूरी दिक्षितबद्दल त्याला काहीही माहीती नाही. हिच गोष्ट मला आवडली आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला’.

लग्नानंतर माधूरीने फिल्म इंडस्ट्री सोडून तिच्या वैयक्तिक आयूष्यावर लक्ष देण्याचा निर्णय घेतला. माधूरीला आरिन आणि रियान ही दोन मुल झाली. माधूरी आज ५३ वर्षांची आहे. तिच्या लग्नाला अनेक वर्ष झाली तरी ती तिच्या नवऱ्यासोबत सुखी आहे. लग्नाच्या एवढ्या वर्षांनतरही माधूरी आणि तिच्या नवऱ्याच्या भांडणाच्या बातम्या आल्या नाहीत.

माधूरी तिच्या पतीसोबत खुप सुखी आहे. तिला अनेक वेळा तिच्या सुखी संसाराचे रहस्य विचारण्यात आले होते. एवढ्या दिवसांनी माधूरीने तिच्या सुखी संसाराचे रहस्य उघड केले आहे. माधूरीचे आणि तिच्या नवऱ्याचे एकमेकांवर खुप प्रेम आहे. दोघेही नेहमी एकमेकांना समजून घेतात.

महत्वाच्या बातम्या –

…आणि ती त्याला पेट्रोलला पैसे द्यायची; वाचा श्रेयस तळपदेची भन्नाट लव्ह स्टोरी

…म्हणून कपूर कुटुंबाने जेष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची शोकसभा घेतली

मेंहदी है रचनेवाली! स्वप्नालीच्या हातावर लागली आस्तादच्या नावाची मेंहदी; बघा मेंहदी सोहळ्याचे फोटो

पैसे नसतानाही सुरु करा स्वत: चा नवीन व्यवसाय; तरुणांसाठी सोनू सूदची नवीन स्किम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.