अमिताभ बच्चनसाठी माधूरी दिक्षितने अनिल कपूरला सोडले; पण अमिताभने चित्रपट केला बंद

हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील महानायक अमिताभ बच्चनला कोणत्याही ओळखीचे गरज नाही. भारतासोबतच जगभरातही त्यांचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. त्यांचे नावच कोणत्याही चित्रपटाला यशस्वी बनवण्यासाठी योग्य आहे. अमिताभने आजपर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट केले आहे.

सुपरस्टार असूनही अमिताभचे इंडस्ट्रीतील प्रत्येक व्यक्तिसोबत खुप चांगले नाते आहे. अनेकांसोबत त्यांची मैत्री आहे. त्यांना लोकांशी दुश्मनी करायला आवडत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये एक अभिनेत्री अशी आहे जिच्यासोबत अमिताभ बच्चनची चांगलीच दुश्मनी झाली होती. ज्यामूळे त्यांनी पुर्ण करिअरमध्ये तिच्यासोबत कधीच काम केले नाही.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलीवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षित आहे. माधूरी दिक्षितनेच अमिताभसोबत दुश्मनी घेतली होती. त्यानंतर अमिताभने देखील माधूरीला चांगलाच धडा शिकवला होता. जाणून घेऊया नक्की काय आहे हे सगळं प्रकरण.

माधुरी दीक्षित बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यांना लेडी अमिताभ बच्चन म्हणून ओळखले जाते. पण माधुरी दिक्षितला पण करिअरच्या सुरुवातीला अनेक अडचणींचा सामान केला आहे.

लेडी अमिताभ म्हणून ओळख असली. तरी सुरुवातीच्या काळात माधूरीकडे मोठ्या प्रमाणावर काम नव्हते. माधूरीचे अनेक चित्रपट देखील फ्लॉप झाले होते. त्यामूळे तिच्यासोबत कोणताही मोठा कलाकार काम करण्यास तयार नव्हता.

अशा वेळेस अनिल कपूरने माधुरीची मदत केली होती. माधूरीला एका हिट चित्रपटाची गरज होती. या काळात अनिल कपूर माधूरीच्या मदतीला धावला. त्याने माधूरीसोबत काम करण्यास होकार दिला.

अनिल कपूर आणि माधुरी यांनी ‘परींदा’ चित्रपटामध्ये एकत्र काम केले. हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर त्या दोघांनी तेजाब, बेटा यांसारख्या सुपरहिट चित्रपट केले. या चित्रपटांनंतर हे दोघेही सुपर स्टार झाले होते. त्यामुळे दोघानांही अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

याच कालावधीमध्ये माधुरी दिक्षितला अमिताभ बच्चनसोबत काम करण्याची संधी मिळाली. पण तिने या चित्रपटाला नकार दिला. यामागचे कारण होते अनिल कपूर. कारण अनिल कपूर यांना माधुरी दिक्षितसोबत काम करायचे होते.

त्यामुळे त्यांनी तिला दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्यासोबत काम करण्याची परवानगी दिली नाही. पण काही दिवसांनी अनिल कपूरच्या करिअरला उतरते वळण लागले आणि अशा काळात माधूरीने त्याची साथ सोडून दिली.

करिअरसाठी माधूरीने अमिताभ बच्चनसोबत काम करायला होकार दिला. १९८८ मध्ये दिग्दर्शक टिन्नू आनंदने माधूरीला अमिताभसोबत ‘शिन्नत’मध्ये कास्ट केले. चित्रपटाची शुटींग सुरु झाली होती.

पण काही दिवसांच्या शुटींगनंतर माधूरीने नखरे दाखवायला सुरुवात केली. कारण तिला वाटत होते की चित्रपटात अमिताभची भुमिका तिच्यापेक्षा खुप मोठी आहे. तिने शुटींग करायला नकार दिला आणि स्क्रिप्टमध्ये बदल करण्यास सांगितले.

दिग्दर्शकाने या गोष्टीला नकार दिला. त्यांचे म्हणणे होते की, चित्रपट साईन करण्यापूर्वीच माधूरीला तिच्या रोलबद्दल माहीती होते. तरीही तिने चित्रपट साईन केला. आत्ता त्यात काहीही बदल होणार नाहीत.

अमिताभला ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनी दिग्दर्शकाला चित्रपट बंद करायला सांगितला. तोपर्यंत शुटींगसाठी पैसे खर्च झाले होते. ते पैसे दिग्दर्शकांना परत करत त्यांनी चित्रपट बंद करायला सांगितला. चित्रपट बंद झाल्यानंतर माधूरी परत एकदा रस्यावर आली होती.

कारण तिने अमिताभसोबत काम करण्यासठी अनिल कूपरला नकार दिला होता. पण हा चित्रपट अमिताभने बंद केला आणि माधूरीला दुश्मन समजून घेतले. ज्यामूळे माधूरीचे खुप जास्त नुकसान झाले होते. अनेक दिवस तिला काम मिळणे बंद झाले होते.

महत्वाच्या बातम्या –
सलमान खान, माधूरी दिक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या साहिला चड्डाची आज झाली आहे वाईट अवस्था
भिकारी बनणे संजीव कुमारला पडले महागात; दिग्दर्शकाने न ओळखताच सेटवरुन पळवून लावले
‘शोले’ चित्रपटातील गब्बरचा लुक रमेश सिप्पीने नाही तर आमजद खानने केला होता डिझाइन
ऋषी कपूरने नीतू सिंगला हिऱ्याचा हार देत लग्नासाठी केले होते प्रपोज; वाचा त्यांची हटके लव्ह स्टोरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.