…म्हणून माधुरी दीक्षित करिअरच्या टॉपवर असताना बॉलीवूड सोडून गेली होती

असे बोलले जाते आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हायला हवी. खास करुन लग्न. लोक बोलतात की, मुलींनी वेळेवरच लग्न केले पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का कधी कधी तुमचा लग्न करण्याचा निर्णय तुमचे आयुष्य बदलून टाकतो.

असेचं काही झाले आहे बॉलीवूड अभिनेत्रींच्या करिअरबद्दल. कारण बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींनी करिअरच्या टॉपवर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि हिच त्यांची सर्वात मोठी चुक झाली. लग्नानंतर त्यांचे करिअर पुर्णपणे खराब झाले.

जाणून घेऊया बॉलीवूडच्या काही अशा अभिनेत्रींबद्दल ज्यांनी करिअरच्या टॉपवर असताना लग्न केले. त्यांच्या लग्नाच्या निर्णयामूळे त्यांचे करिअर खराब झाले.

१) माधुरी दीक्षित – बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ९० च्या दशकात टॉपची अभिनेत्री होती. तिच्या पुढे कोणतीही अभिनेत्री टिकू शकत नव्हती. तिने हम आपके है कौन, दिल तो पागल है आणि देवदास यांसारखे सुपरहिट चित्रपट केले.

एवढ्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर माधुरी दीक्षित यशाच्या शिखरावर पोहोचली होती. पण या शिखरावर असताना माधुरी दीक्षितने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती बॉलीवूडमधुन गायब झाली. आपल्या लग्नामूळे माधूरी दिक्षीतने करिअरच्या टॉपवर असताना बॉलीवूड सोडले.

तिने अमेरिकेन डॉक्टर श्रीराम नेनेसोबत लग्न केले आणि ती अमेरिकेला शिफ्ट झाली. यामुळे ती बॉलीवूडपासून लांब गेली आणि तिचे करिअर संपले. लग्नानंतर अनेक वर्षे ती अमेरिकेतच होती. पण काही दिवसांनी ती बॉलीवूडमध्ये परत आली. परत आल्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये हवे तसे यश मिळाले नाही

२) ऐश्वर्या राय – मिस वर्ल्ड आणि मिस इंडियामध्ये उत्तम प्रदर्शन केल्यानंतर ऐश्वर्या रायने बॉलीवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिला यात यश देखील मिळाले. खुप कमी वेळात ती यशस्वी झाली.

तिने एकापेक्षा एक चित्रपटांमध्ये तिचे अभिनय कौशल्य दाखवले आणि बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री झाली. पण त्यांनतर २००७ मध्ये तिने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले आणि तिचे करिअर संपले. तिने कमबॅक केला. पण तिला यश मिळाले नाही.

३)काजोल – काजोलने खुप कमी वेळात बॉलीवूडमध्ये यश मिळवले. तिने तिच्या दमदार अभिनयाने अनेक भुमिका गाजवल्या. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.

पण १९९८ मध्ये ती करिअरच्या टॉपवर असताना. तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिने अभिनेता अजय देवगनसोबत लग्न केले आणि संसारात व्यस्त झाली. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम केले पण तिला काही खास यश मिळाले नाही.

४)राणी मुखर्जी – एक काळ असा होता ज्यावेळी राणी मुखर्जी बॉलीवूडवर राज्य करत होती. तिचे सर्व चित्रपट सुपरहिट होत होते. ती यशाच्या शिखरावर होती.

याच कालावधीमध्ये राणीने निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले. लग्नानंतर तिने अभिनयातून ब्रेक घेतला. परत थोड्या दिवसांनी तिने कमबॅक केला. पण तिला यश मिळाले नाही.

महत्वाच्या बातम्या –

बालकलाकाराचे काम करण्याऱ्या ‘या’ हिरोईनचे नाव वेश्या व्यवसायामध्ये समोर आले होते

प्रेमाच्या चक्करमध्ये बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रीला खावी लागली होती जेलची हवा

शाहरुख खानची लाडली सुहाना खानच्या फोटोवरून तुमची नजर हटणार नाही

सैराटमधील प्रदीप आठवतोय? सध्या काय करतोय बघून आश्चर्यचकीत व्हाल

घरच्या घरी बनवा १० रूपयांत ५० रुपयांचा हँडवॉश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.