दिलेले वचन माधुरीने पुर्ण केले, खेड्यातील गरीब मुलाला घेतले डान्स दिवानेमध्ये, पहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आणि धकधक गर्ल माधुरी दिक्षित एक चांगली कलाकार आहे. त्याचबरोबर डान्सरसूध्दा आहे. माधुरी दिक्षितने काही दिवसांपुर्वी ऊसाच्या फडात डान्स करणाऱ्या मुलीचे सोशल मिडियावर कौतूक केले होते. त्यानंतर तिने एका छोट्या मुलाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. माधुरीने “या मुलातील कला देशाला दाखवायची गरज आहे.” असं म्हणतं याला डान्स शोमध्ये घेणार असल्याचं म्हटलं होतं.

गावातील एका मुलाने अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. त्याची डान्सची आवड पाहून माधुरी दिक्षितने त्याचे कौतूक करत त्याला डान्स दिवाने-३ शोमध्ये घेणार असल्याचं सांगितलं होतं. माधूरीने जे बोललं होतं ते खरं करून दाखवलं आहे. डान्स दिवाने-3 मध्ये या मुलाला घेऊन त्याच्यातील कला संपुर्ण देशाला दाखवली आहे.

 

झारखंड राज्यातील धुरूवा गावात अमन कुमार राज राहतो. त्याचं वय अवघं आठ वर्ष आहे. अमनचे वडिल न्हावी आहेत. घरची गरीब परिस्थिती असूनही अमनने मेहनत घेत डान्सची कला जोपासली आहे. वडिलांनीही मुलाच्या डान्सची आवड पाहून अनेक ठिकानी त्याला ऑडिशनला घेऊन गेले आहेत.

माधुरी दिक्षित कलर्स टीव्हीवरील डान्स दिवाने-३ या कार्यक्रमात परिक्षक म्हणून आहेत. आधीही त्या याच कार्यक्रमाच्या दोन्ही सीजनमध्ये परिक्षक म्हणून पाहायला मिळाल्या होत्या. माधुरीने या छोट्या मुलाचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर  त्याला प्रसिध्दी मिळवून दिली आहे.

अमनने डान्स दिवाने-३ या कार्यक्रमात नृत्य करत प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घातली आहे. गरीबीतून पुढे येत असलेल्या या छोट्या मुलाची कला पाहून नेटकऱ्यांनी प्रशंसा केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
बॉलीवूडचे हॅंडसम हंग विनोद खन्नाच्या वडीलांनी ताणली होती त्यांच्यावर बंदूक; कारण ऐकून थक्क व्हाल
आयुष्याने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले, पण नंतर एका शिक्षकाने तिचे आयुष्य उभारले
अभिनेते जॅकी श्रॉफला घरकाम करणाऱ्या तरूणीच्या आजीचं निधन झाल्याचं समजलं अन्…
बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने केलीये आतापर्यंत अडीच लाख कॅन्सर पीडित मुलांची मदत

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.