बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत आहे माधूरी दिक्षितचा ३६ चा आकडा; जाणून घ्या कोण कोण आहेत त्या अभिनेत्री

बॉलीवूडची धकधक गर्ल माधूरी दिक्षित ५४ वर्षांची झाली आहे. आज चित्रपटांपासून दुर असलेली माधूरी एकेकाळी दिग्दर्शकांची पहीली पसंत होती. ९० च्या दशकातील प्रत्येक दिग्दर्शक माधूरीसोबत काम करण्यासाठी वाट बघायचे. माधूरीने त्याकाळी लाखो लोकांची झोप उडवली होती.

आजही माधूरी दिक्षितचे लाखो करोडो चाहते आहेत. तिने ९० च्या दशकातील प्रत्येक मोठ्या अभिनेत्यासोबत काम केले आहे. अभिनेत्यांसोबत काम केले असले तरी ९० च्या दशकातील अभिनेत्रींसोबत मात्र माधूरीचा ३६ चा आकडा होता. जाणून घेऊया कोण कोण आहेत त्या अभिनेत्री?

श्रीदेवी – ८० आणि ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून श्रीदेवींकडे पाहीले जात होते. त्यांची सुंदरता आणि दमदार अभिनय लोकांना खुप आवडत होता. म्हणून श्रीदेवीला पहीली लेडी सुपरस्टारच्या नावाने ओळखले जाते. त्यांच्या स्टारडमला टक्कर देणारे कोणीही नव्हते.

पण ९० च्या दशकामध्ये श्रीदेवी यांना टक्कर देणाऱ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली होती. या अभिनेत्रीचे नाव होते माधूरी दिक्षित. ‘तेजाब’ चित्रपटानंतर माधूरी बॉलीवूडची टॉपची अभिनेत्री होणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. याच सर्व कारणांमूळे माधूरी दिक्षित आणि श्रीदेवीमध्ये मैत्री होऊ शकली नाही.

२ मीनाषी शेषाद्री – ८० आणि ९० च्या दशकामध्ये आणखी एक अभिनेत्री होती. जिने तिच्या सुंदरतेने लोकांना वेडं लावले होते. या अभिनेत्री नाव होते मीनाक्षी शेषाद्री. मीनाक्षी आणि माधूरीने एकाच वेळी त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. पण मीनाक्षीला लवकर यश मिळाले.

तर माधूरी दिक्षितला यश मिळायला वेळ लागला. ज्या तेजाब चित्रपटातून माधूरी स्टार बनली होती. तो चित्रपट पहीले मीनाक्षीला ऑफर झाला होता. पण त्यांनी नकार दिला आणि माधूरी दिक्षित स्टार बनली. त्यामूळे या दोन्ही अभिनेत्रींची मैत्री झाली नाही.

३ रवीना टंडन – मस्त मस्त गर्ल रवीना टंडनसोबत देखील माधूरीचे चांगले संबंध नव्हते. कारण ज्यावेळी माधूरी दिक्षित स्टार बनली होती. त्याच वेळी रवीनाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. डेब्यूनंतर खुप कमी वेळातच रवीनाला यश मिळाले.

रवीना टंडनचे हे यश माधूरीच्या करिअरसाठी योग्य नव्हते. यशाच्या शिखरावर असताना रवीनाने माधूरीला चांगलीच टक्कर दिली होती. म्हणून या दोघींची मैत्री होऊ शकली नाही. पण आज मात्र दोघींमध्ये खुप चांगले संबंध आहेत. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहीले जाते.

जुही चावला – चुहा चावलाने स्वत: एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आणि माधूरीच्या भांडणाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, माधूरी दिक्षितमूळे त्यांनी ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला नकार दिला होता. ९० च्या दशकामध्ये दोघींच्या भांडणाने चांगल्याच बातम्या बनवल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –
मराठमोळ्या श्रेयसला बाॅलीवूडमध्ये सिनेमे का मिळत नाहीत? स्वत: श्रेयसनेच सांगीतले ‘ते’ घाणेरडे कारण
विवाहित असताना देखील अभिनेत्रींच्या प्रेमात पागल झाले होते ‘हे’ अभिनेते
..म्हणून इम्रान खान आणि रेखाच्या लग्नाच्या बातम्या सगळीकडे छापून आल्या होत्या
पार्टीत सगळ्यांसमोर राजकूमारने केला होता सनी देओलचा अपमान; चिडलेल्या सनी देओलने…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.