माधूरी दिक्षित ‘धक धक करने लगा’ या गाण्यात ‘आऊच’ का म्हणाली?; तब्बल ३० वर्षांनंतर झाला खुलासा

धक धक गर्ल म्हणजेच माधूरी दिक्षितला तिच्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये एख वेगळी ओळख मिळाली आहे. बॉलिवूडमध्ये असे खुप गाणे आहेत, ज्यांना प्रसिद्धी माधूरी दिक्षितच्या डान्समुळेच मिळाली आहे.

माधूरी दिक्षितल्या काही गाण्यांपैकी चाहत्यांचे धक धक करने लगा हे गाणे पण फार आवडते आहे. त्यातला माधूरीचा डान्स आजही चाहत्यांच्या मनाला भुरळ पाडतो. पण त्या गाण्याला सर्वात आकर्षित बनवतो, तो शब्द म्हणजे आऊच! या शब्दामुळे या गाण्याला लोकांनी पसंत केले होते.

आता याच गाण्यामागचा एक किस्सा समोर आला आहे. अनेकांना प्रश्न पडला होता की माधूरीने तेव्हा आऊच का केलं असेल, आता त्याच प्रश्नाचे उत्तर गाण्याचे संगीतकार अनुराधा पौडवाल यांनी दिले आहे.

अनुराधा पौडवाल यांनी इंडियन आयडॉल या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी त्यांनी धक धक करने लगा गाण्यामध्ये आऊच का म्हटले होते, हे त्यांनी सांगितले आहे. ज्यामुळे ३० वर्षानंतरही हे गाणे तितकेच लोकप्रिय आहे.

जेव्हा धक धक करने लगा गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु होते. तेव्हा मला बाहेर गावे जाण्यासाठी विमान पकडायचे होते. पण निर्मात्यांनी सांगितले की रेकॉर्डिंग पुर्ण करुन जा. तसेच त्यांनी गाण्यात काही तरी हटके शब्दाची मागणी केली होती, जसा अरे रे रे,

मी तेव्हा खुप विचार केला पण काही सुचत नव्हतं. अशातच माझ्या तोंडातून आऊच! हा शब्ध बाहेर पडला. खरं पाहता हा शब्द मी सहज उच्चारला होता, पण तो गाण्यासाठी फिट बसला आहे. तसेच माधूरीनेही या गाण्यात दमदार डान्स केला. त्यामुळे हे इतकं लोकप्रिय झाले. याचे पुर्ण श्रेय मी माधूरीला देते, असे अनुराधा पौडवाला यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मालाडमध्ये फांदी पडून हेल्मेटचे झाले दोन तुकडे अन् तरुणाचा मृत्यु; थरारक व्हिडिओ आला समोर
आता पाकिस्तान आणि चीनला फुटणार घाम, भारताला मिळणार ‘हे’ धोकादायक शस्त्र
‘या’ बॉलरच्या बॉलिंगला घाबरत होते मोठमोठे बॅट्समन, आज त्याला दोन वेळचे जेवणही मिळणे झाले अवघड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.