माधुरी दीक्षितने शेअर केला विना मेकअपचा फोटो, फोटो पाहून चाहत्यांना विश्वासच बसेना, म्हणाले..

मुंबई |  बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिच्या सौदर्याच्या बाबतीत कोणीही टक्कर देऊ शकत नाही. वयाच्या ५४ व्या वर्षांतही तिचे अनेक चाहते आहेत. माधुरीने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवूडमध्ये माधुरी दीक्षितची ओळख धकधक गर्ल म्हणून आहे. तिच्या फॅशन सेन्सचे लाखो चाहते आहेत. याशिवाय आजही माधुरीची प्रत्येक अदा पाहून चाहते फिदा होतात. वयाच्या ५४ वर्षातही माधुरी तितकीच सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिचे विविध अंदाजातील फोटो सतत व्हायरल होत असतात.

माधुरीच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. अशात माधुरीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो माधुरी मेकअप करत असल्याचा आहे. फोटोत माधुरीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्याचे पाहायला मिळते.

व्हायरल होणाऱ्या या फोटोत माधुरी पडद्यावर सुंदर दिसते तितकी सुंदर ती दिसत नाही. तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. माधुरीच्या विनामेकअप लूकवर चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

माधुरीच्या या फोटोवर चाहत्यांना विश्वास होत नाही. ते हा फोटो तिचा खरा फोटो नसल्याचे सांगत आहेत. काहींना हा फोटो खरा वाटतोय. अनेकांनी माधुरीच्या विनामेकअप लूकलाही पसंती दिली आहे. वयानुसार साहजिक सौंदर्य कमी झाले असेल पण तरीही पूर्वी इतकीच सुंदर माधुरी आमच्यासाठी असल्याचे सांगत चाहते माधुरीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

दरम्यान फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार नेहमीच सुंदर दिसतात. कलाकार त्यांच्या सुंदरतेने सर्वांना वेडं लावतात. खास करुन अभिनेत्री त्यांच्या सुंदरतेवर तर लाखो लोक घायाळ आहेत. काही अभिनेत्री मुळातच सुंदर दिसतात. तर काही अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतात. आपल्या मेकअपसाठी अभिनेत्री लाखो करोडो रुपये खर्च करत असतात.

महत्वाच्या बातम्या-
सोनाली कुलकर्णीचे दुबईचे अलिशान घर पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; पहा व्हिडिओ
अखेर नेहा कक्करशी झालेल्या ब्रेकअपबद्दल अखेर हिमांशने सोडले मौन; म्हणाला, ‘मी जर वाईट केलं असतं तर..
जाणून घ्या किती मानधन घेतात ‘इंडिअन आयडल १२’ चे परीक्षक नेहा, विशाल आणि हिमेश रेशमिया?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.