…म्हणून माधूरीने व रवीनाने ‘हम साथ साथ है’ला दिला होता नकार; आजही करतात पश्चाताप

दिग्दर्शक सुरज बर्जातिया त्यांच्या कौटूंबिक चित्रपटांसाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अतिशय सुंदर कौटूंबिक चित्रपट केले आहे. खास गोष्ट म्हणजे त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रेक्षकांना खुप जास्त आवडतो आणि बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घालतो.

त्यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून भारतीय संस्कृतीला मोठ्या पडद्यावर दाखवले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’. या चित्रपटाला रिलीज होऊ २१ वर्ष झाली असली तरीही आजही प्रेक्षक या चित्रपटाला खुप पसंत करतात. या चित्रपटात त्यांनी खुपच सुंदरतेने कुटूंब प्रेम दाखवले आहे.

या मल्टी स्टारर चित्रपटात सलमान खान, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, मोहनीश बेहे, तब्बू, रिमा लागू, करिश्मा कपूर, शक्ति कपूर, नीलम कोठारी असे अनेक कलाकार दिसले होते. चित्रपटातील कलाकारांमूळे देखील हा चित्रपट चांगला हिट झाला होता.

माधूरी दिक्षित आणि रवीना टंडनला देखील या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. दोन्ही अभिनेत्रींनी चित्रपटाला नकार दिला. आज त्यांना या गोष्टीचा पश्चाताप होत असेल. पण त्यावेळी मात्र दोघींनी चित्रपटाला नकार दिला होता. ज्यामूळे त्यांच्या करिअरमधला एक हिट चित्रपट राहिला.

माधूरी दिक्षितला चित्रपटातील तब्बूच्या भुमिकेची ऑफर देण्यात आली होती. पण तिने ही ऑफर नाकारली. कारण तिला सलमान खानच्या वहीनीची भुमिका करण्याची इच्छा नव्हती. त्या अगोदर तिने सलमान आणि मोहनीशसोबत हम आपके है कौन चित्रपटात काम केले होते.

दोघांसोबत काम केले असले तरी तिने या चित्रपटाला नकार दिला आणि ही भुमिका तब्बूकडे गेली. अभिनेत्री तब्बूने सलमान खानच्या वहीनीची भुमिका निभावली. हा चित्रपट तब्बूच्या करिअरमधला सर्वात हिट चित्रपट ठरला. आजही लोकं तिच्या या चित्रपटातील भुमिकेचे कौतूक करतात.

माधूरीसोबतच रवीनाने देखील चित्रपट नाकारला होता. रवीना टंडनला सोनाली बेद्रेची भुमिका ऑफर झाली होती. कारण तिची जोडी चाहत्यांना सलमानसोबत खुप आवडत होती. पण तिने देखील चित्रपट नाकारला. रवीना टंडनचे म्हणणे होते की, तिच्या करिअरसाठी मल्टी स्टारर चित्रपट चांगले नाहीत. म्हणून तिने हा चित्रपट केला नव्हता.

पुढे जाऊन तिला या गोष्टीचे खुप वाईट वाटले. कारण हा सुपरहिट ठरला. त्यासोबतच सलमान खान आणि सोनाली बेंद्रेची जोडीची देखील सुपरहिट ठरली. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी खुप पसंत केले होते. आजही सोनाली आणि सलमानची जोडी चाहत्यांना खुप आवडते.

महत्वाच्या बातम्या –

.. आणि विराट कोहलीने ते स्वप्न केले पूर्ण, ६ वर्षांपासून त्यासाठी झटतोय, जाणून घ्या
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत आहे माधूरी दिक्षितचा ३६ चा आकडा; जाणून घ्या कोण कोण आहेत त्या अभिनेत्री
इथेही फिक्सींग! ‘खतरों के खिलाडी ११’ चा विजेता कोण असणार हे अभिनेत्रीने स्पर्धेआधीच सांगीतलं
प्राजक्ता गायकवाडचे लवकरच ‘लॉकडाऊन लग्न’; पहा तयारीचे व्हिडिओ आणि फोटोज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.