विवाहीत व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी मधुबाला त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा खर्च उचलायला होत्या तयार

मधूबालाच्या सुंदरतेवर अनेक लोकं फिदा होते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या सुंदरतेला टक्कर देणारी अभिनेत्री आजही आली नाही. त्यांच्या सुंतरतेचे आजही लाखो दिवाने आहेत. दुसऱ्या अभिनेत्रींप्रमाणे मधूबालाचे देखील अनेक आशिक होते.

त्यांच्या आशिकांमध्ये दिलीप कुमार, राज कपूर अशा अनेक मोठ्या अभिनेत्यांचे नाव येतात. पण या यादीतील सर्वात चर्चित नाव होते ते म्हणजे मुंबईचा अंडरवरर्ल्ड डॉन हाजी मस्तानचे. हाजी मस्ताने मधूबालावर खुप जास्त प्रेम होते.

एवढे दिवाने असले तरी मधूबाला त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये एकट्या होत्या. त्या अनेक लोकांच्या प्रेमात पडल्या होत्या. पण त्यांना त्यांचे खरे प्रेम शेवटपर्यंत भेटले नाही. मधूबालाला नकार देणे सोपे नव्हते.

पण बॉलीवूडच्या एका संगीतकाराने त्यांना सरळ नकार दिला ज्यामुळे त्या दुखी झाल्या होत्या. त्यांच्या या प्रेम कहाणीबद्दल खुप कमी लोकांना माहिती आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण होता तो व्यक्ती ज्याने मधूबालाला नकार दिला होता?

त्या व्यक्तिचे नाव होते एस मोहिंदर. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक हिट गाण्यांना संगीत दिले होते. त्यांना भेटल्यानंतर मधुबाला त्यांची दिवानी झाली होती. दोघांच्या भेटी वाढत गेल्यानंतर मधुबाला विवाहित एस मोहिंदरच्या प्रेमात पडल्या होत्या.

जास्त वेळ वाया न घालवता मधुबालाने त्यांच्या मनातील गोष्ट एस मोहिंदर यांना सांगितली. एवढेच नाही तर मधूबालाने त्यांना सांगितले की, लग्नानंतर त्या त्यांच्या पहिल्या पत्नी आणि मुलांचा सगळा खर्च उचलायला तयार आहे. हे ऐकून मोहिंदर शॉक झाले.

काही दिवस विचार केल्यानंतर एस मोहिंदरने मधुबालाला नकार दिला आणि त्यांचे हृदय तोडले. त्यांनी मधुबालाचा विचार न करता त्यांच्या पत्नीचा आणि मुलांचा विचार केला. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत राहणे पसंत केले.

महत्वाच्या बातम्या –

बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
पारदर्शक कपडे घालून फोटोशुट करणे अभिनेत्रीला पडले महागात; लोकं म्हणाले थोडी तरी लाज ठेव; पहा फोटो..
मीरा राजपूतने कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे; व्हिडिओ पाहून हैराण झालेला पती शाहिद कपूर म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.