मधूबाला ‘या’ विवाहीत दिग्दर्शकाच्या प्रेमात पागल झाल्या होत्या; घेतला होता लग्न करण्याचा निर्णय

बॉलीवूड चित्रपटा त्यांच्या प्रेम कहाण्यांमूळे खुप जास्त चर्चेत असतात. चित्रपटातील प्रेम कहाण्यांसोबतच बॉलीवूडच्या जगात देखील अनेक प्रसिद्ध प्रेम कहाण्या आहेत. पण प्रत्यके प्रेम कहानीचा शेवट चांगला होत नाही. अशा अनेक प्रेम कहाण्या आहेत जाणून घेऊया अशाच एका प्रेम कहानीबद्दल.

ही कहानी आहे बॉलीवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री मधूबालाची. मधूबालाला आजही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सुंदरतेचे चर्चे सगळ्या इंडस्ट्रीमध्ये व्हायचे आणि आजही होतात. अनेक जण मधूबालाच्या प्रेमात पागल झाले होते.

बॉलीवूडचे अनेक अभिनेते मधूबालावर प्रेम करत होते. मधूबाला मात्र एका विवाहीत व्यक्तिच्या प्रेमात पागल झाल्या होत्या. त्यांचे हे प्रेम यशस्वी होऊ शकले नाही. पण त्यांच्या या प्रेम कहानीचे चर्चे मात्र आजही होतात. पुढेही होत राहतील.

मधूबाला ज्या व्यक्तिच्या प्रेमात पागल झाल्या होत्या त्या व्यक्तिचे नाव होते कमाल अमरोही. दिग्दर्शक कमाल अमरोही अभिनेत्री मीना कुमारीचे पती होते. त्या दोघांचे लव्ह मॅरेज झाले होते. पण त्या दोघांमध्ये मधूबालाची एन्ट्री झाली आणि त्यांची प्रेम कहानी बिघडली.

कमाल अमरोहीने मधूबालाला ‘महल’ चित्रपटामध्ये कास्ट केले होते. या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले. बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला. चित्रपटाच्या सेटवर कमाल अमरोही आणि मधूबालामध्ये खुप चांगली मैत्री झाली होती.

मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ लागले. मधूबाला कमाल अमरोहिच्या प्रेमात पडल्या. त्यांच्यासाठी त्या काहीही करायला तयार होत्या. तर दुसरीकडे विवाहीत असलेले कमाल मधूबालापासून लांब जाण्याचा प्रयत्न करु लागले. त्यांना मधूबाला खुप आवडत होत्या. पण लग्न करायचे नव्हते.

कारण ते अगोदरच विवाहीत होते. त्यांनी मीना कुमारीशी लग्न केले होते. त्यांचे मीना कुमारीवर खुप जास्त प्रेम होते. मीना कुमारीचे कमालवर खुप प्रेम होते. तर मधूबाला देखील कमालच्या प्रेमात पागल झाल्या होत्या.

या तिघांच्या प्रेम प्रकरणाची त्या काळी खुप जास्त चर्चा झाली होती. मधूबालाला कमाल अमरोहीशी लग्न करायचे होते. त्यामूळे त्यांनी कमाल अमरोहीला मीना कुमारीपासून वेगळं व्हायला सांगितले. ही गोष्ट ज्यावेळी मीना कुमारीला समजली त्यावेळी त्यांनी घटस्फोटाला नकार दिला.

मीना कुमारीने घटस्फोटाला नकार दिल्यामूळे कमाल अमरोही त्यांच्याकडे परत गेले. त्यांनी मधूबालाला सोडले. या ब्रेकअपनंतर मधूबाला खुप दुखी होत्या. दुसऱ्या प्रेम कहाण्यांप्रमाणे त्यांची ही प्रेम कहानी देखील अपूर्णच राहिली.

महत्वाच्या बातम्या –

‘या’ व्यक्तिच्या प्रेमात पागल झाली होती एकता कपूर; २२ व्या वर्षी घेतला होता लग्न करण्याचा निर्णय

वाईट चित्रपट करण्यापेक्षा मी एखाद दुकान टाकून सामान विकेल म्हणणाऱ्या अभिनेत्यावर काय दिवस आलेत बघा

हमारी अधूरी कहानी! वाचा किंग ऑफ रोमान्स यश चोप्राची अधूरी प्रेम कहानी

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा दिग्दर्शक मंदार देवस्थळीवर पैसे थकवल्याचा आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.