तरुणपणी त्यांचा साखरपुडा मोडला म्हणुन ब्रम्हचारी राहिले पण कोरोनाने त्यांचे डोळे उघडले

म्हातारपणात बोहल्यावर चढलेले अनेक उदाहरण आपण पाहिले आहेत. पण आता सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे. ज्यात ६६ वर्षीय आजोबा एका ४५ वर्षीय महिलेशी लग्न करत आहेत. अनेकजण या पोस्टची खिल्ली उडवत आहेत. पण खिल्ली उडवण्याआधी कारण तर जाणुन घेणे गरजेचे आहे.

माधव पाटील हे ६६ वर्षाचे आहे. पण तरूण वयात ठरलेला साखरपुडा मोडला म्हणुन अजन्म ब्रम्हचारी राहिले. पण गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोनामुळे माधव पाटील यांनी आपला विचार बदलला आणि त्यांनी लग्न करायचे ठरवले. आणि ४५ वर्षीय महिलेसोबत लग्न केले.

कोरोनामुळे देशात लॉकडाऊन होता. त्याचदरम्यान माधव पाटील यांना एकटे वाटू लागले होते. त्यांच्या आईचे वय ८८वर्ष व स्वतःचे वय 66 वर्ष आहे. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे माधव पाटील यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

माधव पाटील यांचे तीस वर्षाचे असताना लग्न ठरले होते. पण काही कारणाने साखरपुडा मोडला. यानंतर माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. आता माधव पाटील यांचे संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले. पण संजना या घटस्फोटित होत्या. त्यांच्या भावाचे कोरोनाने निधन झाले होते. त्यानंतर त्यांनी माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या ३५ वर्षांपासून माधव पाटील पत्रकारिता क्षेत्रात आहेत. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात रायगडमधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.

फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

मंदिर आणि प्रार्थनास्थळं कधी उघडणार?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले संकेत

आणीबाणी लादणार नाही! फटाक्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.