वाह गं सुगरण! चक्क प्रेशर कुकरमध्ये चपात्या करतेय महिला, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

मुंबई | इंटरनेटवर नवनवीन खाद्यपदार्थाच्या पाककृती शिकण्याच्या अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर केले जातात. ज्यांना खाण्याचे पदार्थ बनवताना अडचणी येतात ते लोक आवडीने हे व्हिडीओ पाहतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बऱ्याच महिलांना विशिष्ट प्रकारे आणि चवदार खाद्यपदार्थ बनवण्याची कला असते. ही कला ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत असतात. यामुळे सोशल मीडियावर स्वयंपाक करताना आवश्य असलेल्या बारीकसारीक गोष्टी देखील उपलब्ध आहेत.

भारतात चपाती बहूतेक सर्वच घरांमध्ये बनवली जाते. बऱ्याच महिलांना व्यवस्थित चपाती बनवता येत नाही. चपाती बनवण्यासाठी पळपोट, लाटणं आणि ती भाजण्यासाठी तवा गरजेचा असतो. पण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील महिला प्रेशर कुकरमध्ये कस काय चपाती भाजू शकते असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल.

एखाद्यावेळी तुमच्याकडे तवा नाही तरीही तुम्ही चपात्या बनवू शकता. शिवाय एक-एक चपाती भाजण्याची गरज नाही. एका वेळी तीन चपात्या कुकरमध्ये भाजता येतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील महिलेने याचे प्रात्यक्षिकच करून दाखवले आहे.

व्हिडीओतील महिला तव्याप्रमाणे कुकरचा वापर करते. यामध्ये तिने पेटवलेल्या गॅसवर रिकामा कुकर ठेवला आहे. यानंतर महिलेने तीन चपात्या लाटल्या आणि त्या एकापाठोपाठ एक अशा कुकरमध्ये ठेवल्याचे व्हिडीओत दिसते. यानंतर महिला कुकरचे झाकण बंद करते. यानंतर महिला पाहणाऱ्या दर्शकांना तीन मिनिट थांबण्याची विनंती करते.

काही वेळानंतर महिला कुकरचे झाकण उघडते आणि त्यातील तीन चपात्या काढते. या चपात्या पुर्णपणे भाजलेल्या असतात. त्या चपात्या ती दर्शकांना दाखवते. चपात्या पाहून असं लक्षात येत की तव्यावर भाजलेल्या चपात्या आणि कुकरमध्ये भाजलेल्या चपात्या यामध्ये काही फरक नाही.

महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चपाती बनवण्याचे अनोख जुगाड असल्याचे दिसते. अनेक कारणांमुळे तवा उपलब्ध होत नाही. तेव्हा अशाप्रकारे प्रेशर कुकरच्या मदतीने चपाती बनवता येते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-
ह्या बाळाचा डान्स पाहून भले भले तोंडात बोट घालतील; गाणंही किती गोड गातय..; पहा व्हिडीओ
VIDEO: प्लास्टिक बाटल्यांच्या मदतीने पोहत आला दुसऱ्या देशात, सैनिकांनी पकडताच म्हणाला…
त्या ८ महिन्यांच्या गरोदर होत्या, मात्र दिवस-रात्र काम करून बनवले कोरोना चाचणीचे किट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.