या मेकॅनिकने लढवलीय अशी शक्कल की फक्त एका लिटरमध्ये गाडी देते 150 किलोमीटर ॲव्हरेज

आपल्याला जर आपल्या स्वप्नांना सत्यात आणायचे असेल तर आपल्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते. परिस्थिती कशीही असली तरी आपण आपले स्वप्न सत्यात आणू शकतो हा विश्वास खूप महत्वाचा असतो.

उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील विवेक या युवकाने असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. विवेक हा गुडदी गावात राहणार मुलगा आहे. ह्या विवेकाने असा पराक्रम केला आहे की त्यावर तुमचा विश्वास पण बसणार नाही. त्याने गाडीच्या बाबतीत असा कारनामा केला आहे जो ऐकून तुम्ही पण चकित व्हाल.

कौशांबी येथील याच विवेक पटेल तरुणाला १२ वी मध्ये शिकत असताना असाच आगळा वेगळा फॉर्म्युला मिळाला होता. त्याने या फॉर्म्युल्याचा वापर गाडी, जनरेटर आणि इतर वाहनांचा एव्हरेज फॉर्म्युला वाढविण्यासाठी उपयोग केला आणि तो यशस्वी पण झाला होता.

त्याने या फॉर्म्युलाला मदत मिळावी म्हणून एका गॅरेजमध्ये पण कामाला पण सुरुवात केली. त्याने त्या ठिकाणी दोन वर्ष या फॉर्म्युल्यावर काम केले. मग त्यानंतर त्याला उत्तर प्रदेश काऊंसिलिंग फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबादने प्रमाणित केले गेले.

विवेक कुमारच्या म्हणण्यानुसार त्याने तयार केलेला फॉर्म्युला जर गाडीच्या बाबतीत वापरला तर गाडीचे ऍव्हरेज वाढून ते १५० किलोमीटर प्रति लिटर पर्यंत जाईल. विवेकने सांगितले की गाडीचे ऍव्हरेज वाढविण्यासाठी तो गाडीतील कार्बोरेटर बदलून स्वतः तयार केलेलं लावायचा आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये खर्च यायचा.

विवेकला कामासाठी अनेकांनी मदत केल्याचे यावेळी त्याने आवर्जून सांगितले आहे. त्याला कार्बोरेटर बनविण्यासाठी कंपनीला ७५ लाख रुपयांची गरज होती तर त्याला म्मू काश्मीर मधील श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिजनेस इंक्युबेशन सेंटरने या रकमेची मदत केली आहे. विवेकने तयार केलेले कार्बोरेटर वापरले तर पेट्रोल पण जास्त लागत नाही आणि स्पीड व पिकअप वर पण परिणाम होत नाही.

ताज्या बातम्या
सर्वात जवळचा सहकारी राजीव सातवांच्या निधनानंतर राहूल गांधी झाले हळवे; दिली ह्रदयद्रावक प्रतिक्रीया
राष्ट्रवादीची सीट घेऊन राजीव सातवांना निवडणूकीत उतरवलं अन् सातवांनी मोदी लाटेतही जिंकून दाखवलं

VIDEO: “इस्त्रायलसोबत उभे राहणाऱ्यांनी आधी वाजपेयींचे हे भाषण ऐका”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.