पंतप्रधान मोदींची दहशतवाद्यांशी तुलना करणाऱ्या कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक करणार भाजपमध्ये प्रवेश

एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहशतवादीशी तुलना करणारी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री आणि कॉंग्रेस नेत्या एम. विजयशांती आता भाजपमध्ये सामील होणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयशांती हे कॉंग्रेसचे स्टार प्रचारक होत्या.

अभिनयाच्या जगातून राजकारणात उतरलेल्या तेलगू अभिनेत्री विजयशांती यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विजयशांती सोमवारी अधिकृतपणे भाजपमध्ये सामील होतील. तेलंगणाच्या शमसाबादमधील जाहीर सभेत विजयशांती यांनी मोदींची तुलना दहशतवाद्याशी केली होती.

त्यावेळी विजयशांती म्हणाल्या होत्या की, मोदी कोणत्याही वेळी बॉम्ब फोडू शकतात. याची लोकांना कायम भीती वाटते. तर विजयशांती यांनी गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसच्या कार्यक्रमांना येणे बंद केले होते. कॉंग्रेसकडे लक्ष न दिल्याने ती नाराज असल्याचे सूत्रांकडून समजते.

१९९८ साली विजयशांती यांनी आपला राजकीय प्रवास भाजपापासून सुरू केला. त्यावेळी भाजपने त्यांना महिला शाखेचे सरचिटणीस केले. तेलंगणा राष्ट्र समितीमध्ये विजयशांती अतिशय सक्रिय भूमिकेत दिसले होते. विजयशांती यांचे भाजपमध्ये प्रवेश करणे हे एक प्रकारे त्यांचे मायदेशी येणे मानले जाते.

रात्रपाळी करून पिकाला पाणी दिले, तीन लाख खर्च केला, आणि आता किलोला मिळतोय २ रुपये भाव..

“दिलीप कुमारांची प्रकृती नाजूक, त्यांच्यासाठी प्रार्थना करा”; सायरा बानोंचे भावनिक आवाहन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.