धोनीला बिर्याणी न वाढल्यामुळे मला संघातून वगळले, माजी क्रिकेटपटूने सांगितला ‘तो’ किस्सा

सर्वांचा लाडका क्रिकेटपटू म्हणून एमएस धोनीकडे पहिले जाते. धोनीने २००४ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच दरम्यान भारतीय संघातील मोहम्मद कैफ यशाच्या शिखरावर पोहचले होते.

मोहम्मद कैफने केवळ पुढील एक ते दोन वर्षच फक्त भारतीय संघात आपली जागा टिकवून ठेवण्यात यश मिळाले. त्यानंतर कैफला भारतीय संघात जागा मिळाली नाही. कैफला भारतीय संघातील जागा का गमवावी लागली याचा गमतीदार खुलासा केला आहे.

879 Mohammad Kaif Photos and Premium High Res Pictures - Getty Images

मोहम्मद कैफने मीडियाशी बोलताना सांगितले की, एकदा संपूर्ण भारतीय संघाला मी संध्याकाळच्या जेवणाचे आमंत्रण दिले होते. तेव्हा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली हे देखील आले होते. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देण्यात व्यस्त झालो आणि मला युवा खेळाडूकडे म्हणजे एमएस धोनीकडे लक्ष देता नाही आले.

Mohammad Kaif Coaching - YouTube

मोहम्मद यांनी सांगितले की त्यावेळी मी खूप नर्वस होतो. अनेक दिग्गज खेळाडूंसोबतच त्याकाळचे प्रशिक्षक ग्रेग चेपल देखील आले होते. माझे सर्व लक्ष्य या दिग्गज खेळाडूंकडे होते. तसेच एमएस धोनी आणि बाकी युवा खेळाडू वेगळ्या रूममध्ये बसले होते. त्यामुळे माझे लक्ष्य देण या युवा खेळाडूंकडे कमी झाले. त्यामुळे माझे वागण धोनीला आवडले नाही.

त्यानंतर २००७ मध्ये धोनी संघाचे कर्णधार झाले पण मोहम्मद कैफ संघात आपले स्थान कायम राखू शकले नाही. मोहम्मद सांगतात की, धोनी मला नेहमी आठवण करून देतो की जेव्हा मी तुमच्या घरी आलो तेव्हा तू नीट लक्ष्य दिले नाही त्यामुळेच तुला संघातील आपले स्थान गमवावे लागले.

मोहम्मद यांनी मजेशीर पद्धतीने सांगितले की, धोनी कर्णधार होण्याआधी मी त्याला नीट बिर्याणी वाढली नाही म्हणून मला महागात पडले. तसेच धोनीनेही मला मजेशीर टोमणा दिला की जेव्हा टू माझ्या घरी येशील तेव्हा मी तुझ्याकडे लक्ष्य देणार नाही.

हे ही वाचा-

मुस्लिमांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले, तरच सामाजिक समस्यांवर तोडगा निघेल- मुख्यमंत्री हिमंता बिस्वा

पठ्ठाचं नशीब फळफळलं! १०वी नापास रिक्षावाला प्रेमात पोहचला थेट स्वित्झर्लंडला

अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.