मुंबई | देशभरात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे. अलीकडे परिस्थिती आणखीनच गंभीर होत चालली आहे. याच बरोबर कोरोनातून बरे झालेल्यांना कोरोनाचा धोका पुन्हा असल्याचे सांगण्यात आले होते. यामुळे भितीचे वातावरण तयार झाले आहे.
अशातच एक धक्कादायक माहिती समोर मिळाली आहे. भारत, अमेरिका आणि युरोपमधील बर्याच रुग्णांमध्ये फुफ्फुसांची एक मोठी समस्या उद्भवल्याचे समोर येत आहे. जर ही समस्या गंभीर असेल तर रुग्णाचे जीव धोक्यात येऊ शकतात. कोरोनामुळे होणाऱ्या या आजाराचे नाव लंग फायब्रोसिस आहे.
लंग फायब्रोसिस या रोगात फुफ्फुसातील ऊतक म्हणजेच टिश्यू सूजण्यास सुरुवात होते. यामुळे फुफ्फुसांच्या आतल्या हवेची जागा कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणजे श्वास घेण्यात अडचण होते.
याबाबत डॉ. जरीर एफ. उदवागिया, डॉ. परवेज ए. कौल आणि डॉ. लुका रिडेल्डी यांनी लिहिला आहे. कोरोना रुग्णांमधील फुप्फुसांच्या संसर्गामुळे सातत्याने दम लागत असल्याचे दिसून येते. शिवाय श्वास घेण्यासही त्रास होतो. ही समस्या भारत, अमेरिका आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये पाहायला मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोर्टाला काही वाईट बोललं तर तो अवमान मग मुंबई महाराष्ट्राला बोललं तर ती बदनामी नाही का?
कोरोना विषाणूचा जन्म भारतात, तिथूनच जगभरात पसरला; चीनचे संशोधक बरळले
शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे; बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतोय, ‘अण्णा हजारे आता कुठे आहात तुम्ही?