Share

Crime News: ‘सडलेले आंबे टाकतोय!’ दुर्गंधी येताच लोकांनी हटकलं; गोणी उघडताच हादरवणारे दृश्य आले समोर

Crime News: चंदीगड (Chandigarh) शहरातील लुधियाना (Ludhiana) येथील आरती चौक (Aarti Chowk) परिसरात बुधवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. दोन अनोळखी तरुणांनी एक गोणी सार्वजनिक ठिकाणी टाकून पळ काढला. या गोणीत ‘सडलेले आंबे आहेत’ असं सांगत त्यांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्गंधीमुळे स्थानिकांनी संशय व्यक्त केला आणि जेव्हा गोणी उघडण्यात आली, तेव्हा त्यातून एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

‘सडलेले आंबे आहेत’ म्हणत दिशाभूल

फिरोजपूर रोड (Ferozepur Road) येथील दुभाजकाजवळ दोन तरुण निळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आले. त्यांच्याकडे मोठी गोणी होती, जी त्यांनी दुभाजकावर ठेवल्यानंतर निघून जाण्याचा प्रयत्न केला. परिसरातील दुकानदार आणि फेरीविक्रेत्यांना त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांना थांबवून चौकशी केली. “गोणीत सडलेले आंबे आहेत,” असं उत्तर देत त्यांनी वेळ मारण्याचा प्रयत्न केला.

गोणी उघडताच धक्कादायक वास्तव

तरीही नागरिकांचा संशय कायम राहिला. एका प्रत्यक्षदर्शींनी गोणी तपासली असता त्यांना माणसाचा मृतदेह असल्याचा संशय आला. त्याचवेळी काहींनी मोबाइलवर व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं. यातील एक तरुण सुरक्षा रक्षकाच्या (Security Guard) गणवेशात होता, अशी माहितीही समोर आली आहे.

पोलीस तपासात उघड झालं मृतदेहाचं रहस्य

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक अमरजीत सिंग (Amarjit Singh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गोणीत सापडलेला मृतदेह एका महिलेला आहे. तिच्या नाकातून रक्त येत होतं, त्यामुळे मृत्यूचं कारण संशयास्पद वाटत आहे.” पोलिसांनी पल्सर दुचाकी ताब्यात घेतली असून, त्यावरून आरोपींचा शोध घेतला जात आहे. मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुन्हा दाखल, सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले असून, त्याद्वारे आरोपींचा माग काढण्याचं काम सुरू आहे. मृत्यूमागील नेमकं कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now