Share

“आय लव्ह उद्धव. विषय कट”, बाॅलीवूड गायक लकी अलीची पोस्ट व्हायरल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमध्ये ४६ आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले आहे.

या घटनांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. अनेकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यादरम्यान गायक लकी अलीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अनेकनै या पोस्टला लाइक देखील केले आहे.

प्रसिद्ध गायक लकी अलीने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आय लव्ह उद्धव आणि मी त्यांच्या या राजकारणाचा आदर करतो. पूर्णविराम”, असे प्रसिद्ध गायक लकी अलीने पोस्टमध्ये लिहिले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

एका युजरने या पोस्टवर कामें करत लिहिले आहे की, “तुमचा गाण्यांचा मी खूप मोठा चाहता आहे. पण तुमच्या मताशी मी सहमत नाही. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत लिहिले आहे की, “लकी अली तुमच्या वक्तव्याचे समर्थन करतो.” शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. दिवसेंदिवस या बंडखोरीत सामील होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. आता शिवसेनेच्या आमदारांप्रमाणे खासदारही बंडखोरी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. विधिमंडळाच्या सभागृहातच एकनाथ शिंदे यांच्या नव्या गटाला मान्यता मिळू शकते. पण यामध्ये अनके अडचणी येऊ शकतात, अशी माहिती राजकीय तज्ज्ञांनी दिली आहे. शिवसेनेने १२ बंडखोर आमदारांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘..त्यावर बोलण्याची माझी लायकी नाही’; असं काय झालं की अजितदादांनी काढली स्वत:चीच लायकी
शिंदे गटानं शिवसेनेचा डाव उलटवला; आता झिरवळ बंडखोरांची आमदारकी रद्द करूच शकत नाहीत
‘या’ चार नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला, जाणून घ्या

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now