Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमधील लखनऊ इथे एक आश्चर्यकारक असा चोरीचा प्रकार आढळून आला आहे. ही एक चेन स्नेचिंग करणारी जीजा आणि मेहुणीची टोळी आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्या कारनाम्याचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.
मोटारसाकलवरून जीजा आणि मेहुणी अतिशय हुशारीने चोरी करत होते. यामधील जीजा मोहम्मद आसिफ हा मोटारसायकल चालवायचा व त्याची मेहुणी राधा ही मागे बसून चोऱ्या करायची. राधा चालत्या गाडीवरून रस्तातुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि मंगळसुत्र खेचत असे.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही अटक केली आहे. हे सगळं बघून पोलिसही हैराण झाले आहेत. दोन्ही आरोपींनी जवळपास असे ८ ते १० गुन्हे केले असल्याची कबुल केले आहे. या दोन आरोपींनी आशियाना येथील एका महिलेची चेन स्नेचिंग केली होती.
पोलीस याप्रकरणाचा तपास करत असताना एक सीसीटीव्ही फुटेज त्यांच्या हाती लागले. त्याआधारे पोलिसांनी एका महिलेसह तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर चौकशीनंतर ते दोघे जीजा आणि मेहुणी असल्याचे समोर आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये आरोपी आसिफ हा पारा मोहन रोडवरील बालगृहातून पळून गेला होता. त्यानंतर तो त्याच्या घरी न जाता सरोजीनीनगरमध्ये लपून बसत होता. तेव्हा राधाच्या बहिणीची आणि त्याची भेट झाली व दोघांनी लग्न केले.
त्यानंतर तो अनेक दिवसांपासून मेहुणी राधाशी मिळून हे चोरीचे कृत्य करत होता. तसेच दोघेही ज्वेलर्सकडे जाऊन स्वतःला अडचणीत असल्याचे सांगत चोरलेले दागिने विकून पैसे आपल्या खिशात घालायचे. पोलिसांनी या दोघांकडून काही रोख रक्कमही जप्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; वाचा नेमकं काय घडलं?
भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’