आररर खतरनाक! व्हॅलेंटाइन्सला बॉयफ्रेंडने दिला धोका, मग काय गर्लफ्रेंडने घातला शहरात धिंगाणा

मुंबई | व्हॅलेंटाइन्स विकचा धडका सुरू आहे. अशात सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडीओ आणि मीम्स व्हायरल होत आहे. अशीच एक घटना लखनऊमध्ये घडली आहे. शहरातील चौका-चौकत पोस्टर्स लावलेले दिसत आहेत. या पोस्टर्सचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे पोस्टर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण हे पोस्टर्स एका मुलीला प्रेमात मिळालेल्या धोक्यामुळे लागले आहेत अशी चर्चा आहे.

प्रेमाच्या आठवड्यात प्रेमी आपलं प्रेम जोडीदाराकडे व्यक्त करतात. पण याच दिवसात प्रेम तुटल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अनेकांच प्रेम तुटते ते लोक शांतपणे या गोष्टी सहन करतात. परंतु लखनऊमध्ये वेगळेच काही घडले आहे.

लखनऊच्या गोमतीनगरमधील चौकात पोस्टर्स पाहायला मिळाले. हे पोस्टर पाहून लोक अश्चर्यचकीत झाले कारण या पोस्टर्सवर सिद्धी हेट्स शिवा असं लिहिण्यात आले होते. या पोस्टर्सवरून स्पष्ट होते की, मुलाने मुलीला प्रेमात धोका दिला आहे. त्याचा राग व्यक्त करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी तिने पोस्टर्स लावले.

खास डिझाईनमध्ये बनवलेले पोस्टर्स शहरात प्रत्येक ठिकाणी लागले आहेत. लोकांच्या अचानक हे नजरेस पडल्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पोस्टर्सचे ठिकठिकाणचे फोटो काढून नेटकऱ्यांनी त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहेत.

तसेच पोस्टर कोणी लावले आणि ते लावण्यापाठीमागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. हे पोस्टर कोणी लावलेत याबाबतची माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि मीम्स धुमाकूळ घालत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
व्हॅलेंटाईन डे स्पेशल: वाचा धकधक गर्ल माधूरी दीक्षित आणि श्रीराम नेनेची लग्नानंतरची हटके लव्ह स्टोरी
शेतकऱ्याचा नाद नाय! दोन भाऊ घरातच केसरची शेती करुन कमवताय लाखो रुपये
खेड्यातील चिमुकल्याच्या भन्नाट डान्सवर धक धक गर्ल माधुरीही फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणते…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.