बारमध्ये दारु पिऊन तरुण-तरुणींमध्ये तुफान हाणामारी, पहा संपुर्ण व्हिडीओ

मुंबई | उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनऊ येथील एका बारमध्ये तुफान राडा झाला आहे. नशेत असणाऱ्या तरुण आणि तरुणींमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत युवक गंभीर जखमी झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, हाणामारीचा हा प्रकार विभूती खंड या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे. समिट बिल्डिंग मधील माई बारचा हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेच्या वेळी बारमध्ये घटनास्थळी उपस्थित असणारे सुरक्षा कर्मचारी निशब्द आणि प्रेक्षक म्हणून सर्व प्रकार पहात असल्याचे दिसून येत आहे.

रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये सतत अशा घटना घडतात. छेडछाड, दोन गटात चकमक यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असते. परंतु यावेळी हे भांडण कोणत्या कारणावरुन झाले याची माहिती अद्याप मिळाली नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओतील सर्वजण एकाच युवकाला गंभीर चोप देताना दिसून येत आहे. यावरुन छेडछेडीच्या वादावरुन हाणामारी झाल्याची प्रथमिक माहिती मिळाली आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस प्रशासनाने अशा घटनांना गांभिर्याने घेण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
बॉलीवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले होते आई वडील; बघा कोणत्या आहेत ‘त्या’ जोड्या
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
धाडस म्हणावं कि स्टंटबाजी! ऊसतोड मजुराने बिबट्याच्या बछड्यासोबत काढले सेल्फी
‘ही’ सोपी ट्रिक वापरत १० वर्षाच्या चिमुकल्याने शेअर मार्केटमधून कमावले लाखो रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.