काय सांगता! ८१९ रुपयांचा सिलेंडर मिळणार फक्त ११९ रुपयांत; ३१ मार्चपर्यंत संधी

मुंबई : सध्या देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपये आहे. परंतु या महागड्या गॅस सिलिंडर्सवर तुम्ही ७०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. होय, ८१९ रुपयांच्या सिलेंडरवर तुम्हाला ७०० रुपयांचे संपूर्ण कॅशबॅक मिळू शकते. हा कॅशबॅक पेटीएम देत आहे.

तुम्ही तुमचा एलपीजी सिलिंडर पेटीएमवर बुक करुन ७०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. अनुदानानंतर एलपीजी सिलिंडर ८१९ रुपये असून देशातील बहुतेक ठिकाणी पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही तो फक्त ११९ रुपयांत खरेदी करू शकता.

महत्त्वाची बाब म्हणजे पेटीएम कडून ही ऑफर बर्‍याच काळापासून सुरू आहे आणि सध्या ३१ मार्चपर्यंत ऑफर घेता येणार आहे. जर तुम्हाला स्वस्त सिलिंडर घ्यायचा असेल तर तुम्हाला याची संपूर्ण प्रोसेस माहिती असणे गरजेचे आहे. तर जाणून घेऊयात सविस्तर…

दरम्यान, आपल्याकडे पेटीएम नसल्यास, इंस्टॉल करा. तुम्हाला पेटीएम अ‍ॅपवरील शो मोअर पर्यायामधील रिचार्ज आणि पे बिल पर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘recharge and pay bills’ वर जा. ‘बुक सिलिंडर’ पर्याय उघडा. पुढे भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस निवडा.

नोंदणीकृत मोबाइल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी भरा. यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल. आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरवर ठेवा, अशा पद्धतीने तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या 

‘कोरोना’चा हाहाकार! अजित पवारांनी पुण्यातील लॉकडाउनसंबंधी केले मोठे भाष्य, म्हणाले….

“फडणवीस रोज पहाटे उठून राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का?”

“…तर त्यांनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा”, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.