एलआयसीमध्ये काम करणारी मुलगी कशी झाली ठाकरे घराण्याची सुन? वाचा भन्नाट लव्हस्टोरी

बुधवारी अचानक प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या. त्याचे कारण होते एका व्यक्तीने त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण केले होते. पोलिसांना यामध्ये एका व्यक्तीला अटक केली आहे.

या कारणामुळे रश्मी ठाकरेंबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी नागरीकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. जेव्हापण उद्धव ठाकरे यांना गरज पडली तेव्हा रश्मी ठाकरे यांनी त्यांची खंबीर साथ दिली आहे. आज आम्ही तुम्हाला दोघांचे लग्न कसे झाले? त्यांची भेट कशी झाली याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.

आज रश्मी ठाकरे यांना मिसेस मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाते. पण जेव्हा त्यांचे लग्न झाले नव्हते तेव्हा त्या एक साधारण मराठी कुटुंबातील एक स्त्री होत्या. त्यांचा जन्म डोंबिवलीतील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता.

शिवसेनेत त्यांना सगळे लोक वहिनीसाहेब या नावाने हाक मारतात. जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर रश्मी ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या मुख्य संपादकपदाची आणि मार्मिक या साप्ताहिकाच्या संपादक पदाची जबाबदारी आली.

त्यामुळे रश्मी ठाकरे थोड्याफार प्रमाणात सामान्य लोकांच्या प्रकाशझोतात आल्या. पण एका सामान्य घरातल्या रश्मी पाटणकर ह्या रश्मी ठाकरे कशा झाल्या हा प्रश्न अनेकांना पडत असतो. रश्मी ठाकरे या मुळच्या मुंबईच्याच आहेत.

त्यांचे वडील केमिकल प्रॉडक्शनचा छोटासा व्यवसाय डोंबिवलीत करत होते. त्याचे नाव होते माधव पाटणकर होते. ते आता या जगात नाहीत. रश्मी ठाकरे यांनी कॉमर्समध्ये पदवी घेतलेली आहे. मुलुंडच्या वझे कॉलेजमध्ये त्यांनी आपले पदवीचे शिक्षण घेतले आहे.

त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या १९८७ मध्ये एलआयसीमध्ये नोकरीला लागल्या. तिथे काम करत असताना त्यांची भेट मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सख्खी मोठी बहिण जयवंती ठाकरे यांच्याशी झाली. जयवंती या देखील त्यांच्यासोबत एलआयसीमध्ये कामाला होत्या.

त्यानंतर दोघींमध्ये खुप घट्ट मैत्री झाली. उद्धव आणि जयवंती ठाकरे यांच्यामध्ये खुप चांगेल बॉन्डिंग होते. त्याच्या काही दिवसानंतर उद्धव ठाकरेंसाठी स्थळ बघण्याचा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी त्यांची बहिण म्हणजे जयवंती कशी मागे राहील.

जयवंती यांनी आपल्या भावासाठी मुलगी शोधण्यास विशेष पुढाकार घेतला होता. याचदरम्यान त्यांची रश्मी यांच्यासोबत घट्ट मैत्री झाली होती. त्यामुळे रश्मीच आपल्या भावासाठी योग्य आहे असे त्यांना वाटले.

त्यानंतर त्यांनी रश्मी यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंना सांगितले. त्यांनी आग्रह केला की तु एकदा रश्मीला भेट. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यावेळी काही लक्ष दिले नाही. त्यानंतर जयवंती यांनी रश्मीची माहिती उद्धव ठाकरे यांच्या स्वर्गवासी आई मीनाताई ठाकरेंना दिली.

मीनाताई त्यावेळी म्हणाल्या की मला काहीच हरकत नाही. परंतु उद्धवची पसंती असायला हवी. त्यानंतर रश्मी यांची घरातल्या सर्व लोकांसोबत ओळख व्हावी यासाठी जयवंती यांनी घरातल्या कार्यक्रमात त्यांना बोलावण्यास सुरूवात केली.

त्यानंतर रश्मी यांना घरातले सगळे लोक चांगले ओळखू लागले. उद्धव आणि रश्मी यांचीही चांगली ओळख झाली होती. त्यानंतर उद्धव आणि रश्मी यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर हेच मैत्रीचे नाते लग्नामध्ये रूपांतरीत झाले. उद्धव आणि रश्मी यांचे १३ डिसेंबर १९८९ रोजी लग्न झाले.

अशा प्रकारे एका साधारण घराण्यातील मुलगी ठाकरे घराण्याची सुन झाली. त्यामध्ये जयवंती ठाकरे यांची महत्वाची भुमिका होती. ही माहिती बीबीसी मराठीने दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
आकाशातून पडलेल्या दगडानं कोट्याधीश झाला मेंढपाळ, पण मोठं मन करत दान केला तो कोट्यावधीचा दगड
मी माझ्या परिवाराला तुझ्यामुळे सोडून चालली आहे; आत्महत्येआधी अल्पवयीन मुलीचं भावूक करणारं पत्र
एक कोटी झाडांपासून ऑक्सिजन मिळवून देणारा ट्री मॅन, पुर्ण जग त्यांना ठोकतंय सलाम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.