विराट कोहलीने अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलेच नव्हते, अशी जमली होती लव्हस्टोरी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची सर्वांत लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. दोघांची लव्ह स्टोरीदेखील खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांच्या चाहत्यांबद्दल त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते.

विराटने एका मुलाखतीत त्यांची पहिली भेट कशी झाली, कुठे झाली याबद्दल खुलासा केला आहे. विराट म्हणाला, अनुष्कासोबत त्यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. अनुष्काला भेटण्यापूर्वी विराट बराच घाबरला होता.

मात्र नंतर त्याने अनुष्काची मस्करी केली, विराट म्हणाला, अनुष्काची उंची जास्त होती, हे पाहून तुला याहून उंच हिल्स नाही मिळाले का? अशी कमेंट केली. मात्र यावर अनुष्का चांगलीच संतापली. ती म्हणाली, एक्सक्यूज मी? त्यानंतर विराटला आपली चूक लक्षात आली.

यानंतर मात्र दोघेही एकामेकांच्या प्रेमात पडले, त्यांनी अनेक दिवस सोबत घालवल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराटने अनुष्काला कधीही प्रपोज केले नाही. त्यांना माहीत होते, आपण लग्न करणार आहोत. त्यांच्या लग्नाला साडेतीन वर्षे होऊन गेली.

यावर्षी ११ जानेवारीला दोघेही आपल्या मुलीचे पालक झाले आहेत, जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले आहे. दोघांनी इटलीमधील टस्कनी येथे अतिशय गुप्तपणे लग्न केले. त्यांनी अचानक लग्न करून सर्वांना चकित केले. लग्नाला मोजकेच लोक उपस्थित होते.

ताज्या बातम्या.

पुण्यातील ‘या’ मोठ्या कंपनीने चीनला कंपनी विकून १४१९ कामगारांना केले कमी

टिक टॉक स्टार १४ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार, विडिओ व्हायरल करण्याची देत होता धमकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.