सर मला खूप आवडतात; चिठ्ठी लिहून सातवीतील मुलगी शिक्षकासोबत पळाली

नाशिक | निफाड तालूक्यातील देवपूर येथील प्रतिष्ठित घरातील सातवीत शिकणारी मुलगी शिक्षकासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलीने तिच्या खोलीत “मला सर खूप आवडतात. मी लग्न करण्यासाठी सरांसोबत पळून जात आहे”. अशी चिठ्ठी लिहून घरातून पळून गेली.

देवपूर येथील अल्पवयीन मुलगी कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात शिकत होती. शाळेत हंगामी शिक्षक म्हणून काम करणारा पंकज साळवे नावाचा २३ वर्षीय तरूण खाजगी शिकवण्या घेतो. दूसरीत असल्यापासून ही मुलगी त्या सरांकडे क्लाससाठी जात होती. याच दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

दोन दिवसांपूर्वी सदरील अल्पवयीन मुलगी घरातून पळून गेली. तिने पळून जाताना घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली त्यामध्ये “सर मला खूप आवडतात मी लग्न करण्यासाठी सरांसोबत पळून जात आहे”. असं लिहून निघून गेली. मुलीने लिहिलेली चिठ्ठी तिच्या खोलीत सापडल्याने कुटुंबाला धक्काच बसला. तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, देवपूर परिसरात खाजगी क्लास घेणारा पंकज साळवे नावाचा शिक्षक एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाच्या घरी शोध घेण्यासाठी गेले असता त्याचे घर बंद असल्याचं आढळून आले.

याबाबत सदर प्रकरणात शिक्षक पंकज साळवे याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास निफाड पोलिस करित असल्याची माहिती निफाडचे पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी तुमच्या उपकाराची परतफेड होणार नाही’
पत्नी दुसऱ्यासोबत पळून गेली म्हणून पती बनला सीरियल किलर, रागाच्या भरात केले १८ खून
अमित शहा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पुढच्या काही तासांत शेतकऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई
हिंसक आंदोलनामागे काँग्रेसचा हात असण्याची शक्यता;  गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.