सिनेमातली लव्हस्टोरी यांच्यापुढे फिकी आहे; वाचा ऋषीकेश आणि प्राचीची अफलातून प्रेमकथा

सातारा । प्रेमाच्या अनेक गोष्टी समाजात घडत असतात. प्रेमात म्हणतात की जर मनापासून प्रेम केले तर तुम्हाला कोणीही वेळगे करू शकत नाही. प्रेमात जीव लावणे, समजून घेणे गरजेचे असते. आता फलटणमध्ये अशाच एका प्रेमाची चर्चा सध्या सुरू आहे. फलटणमध्ये एक आगळावेगळा प्रेमविवाह पार पडला.

या लग्नाची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. साताऱ्यातल्या फलटणमध्ये राहणारा ऋषिकेश मोरे आणि प्राची सावंत अलिकडेच लग्नबंधनात अडकले. पण त्यांच्या प्रेमाची कहाणी इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. ऋषिकेशला दोन्ही हात नाही, पायानेदेखील अपंग आहे.

असे असताना मात्र प्राचीने प्रेम केले ते त्याच्या निखळ स्वभावावर. तिने प्रेम केले ते त्याच्या जिद्दीवर, अशा प्रेम प्रकरणाला शक्यतो घरचे लोक विरोध करतात, असे अनेकदा घडते. ऋषिकेशला संगीताची त्याला उत्तम जाण आहे. तो उत्तम प्रकारचा संगीतकार देखील आहे.

त्यांची भेट तीन वर्षांपूर्वी झाली होती. आणि त्यांचे प्रेम बहरत गेले. गाणी रेकॉर्डिंग करताना त्यांचे प्रेम वाढत गेले. ऋषिकेश म्युझिक कंपोजर असल्याने प्राचीदेखील गाणी गाऊन त्याला साथ देवू लागली. सध्या मुलीला नवरा बक्कळ पगार कमावणारा, पाहिजे असतो. घरी गाडी बंगला असणारा पाहिजे असतो.

असे असताना प्राची मात्र या सगळ्याला अपवाद ठरली आहे. तिला खऱ्या प्रेमातून आपला संसार फुलवायचा होता. आणि तिने ते केले देखील. यामुळे या आगळ्या वेगळ्या प्रेमाची आणि लग्नाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. ऋषिकेश हा पायाने उत्तम चित्र देखील काढतो, त्याची चित्रे प्रसिद्ध देखील आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.