प्रेमाच्या गोष्टी! अर्जुनच्या मिठीत सामावून मलायकाने केला ‘हा’ फोटो शेअर

मुंबई । बॉलीवूडमधील अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून एकत्र दिसतात. मात्र ते अजूनही आपल्या रिलेशनशिपबाबत काही बोलत नाहीत. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दोघांमधील सगळं काही समजत असते. आता मलायकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

या विडिओमुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ओडिओमध्ये अर्जुन कपूरही अनेक ठिकाणी दिसला. आता मलायकाने तिचा अर्जुन कपूरसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून दोघेही प्रेमात किती हरवले आहेत हेच दिसत आहे.

मलायका आणि अर्जुन काही दिवसांपूर्वी धर्मशाला येथे सोबत गेले होते. यावेळी अर्जुन कपूर सैफ अली खान, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नाडिससोबत हिमाचल प्रदेशात भूत पोलीसचे शूटींग करत होता. दिवाळीला मलायका त्याच्याजवळ गेली होती. मलायका मुंबईला परत आली आणि आता असे वाटतंय की, तिला त्याची आठवण येत आहे.

मलायकाने रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. दोघेही हसत आहेत. या फोटोला ‘जेव्हा तू सोबत असतो तेव्हा एकही क्षण निराश करणारा नसतो’. असे कॅप्शन दिले आहे.

यामुळे आता त्यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकत्र दिसत आहेत. यामुळे आता चाहत्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.