आश्चर्यच! भगवान विष्णुची सर्वात उंच मुर्ती भारतात नाही, तर ‘या’ मुस्लिम देशात आहे

हिंदू धर्मामध्ये त्रिदेव म्हणजेच ब्रम्हा विष्णु आणि महेश या तीन देवांना खुप मानले जाते आणि त्यांच्यावर करोडो लोकांची श्रद्धा आहे. सर्वात जास्त भारतात या देवांना मानले जाते. असे असले तरी तुम्हाला माहित आहे का विष्णुची सर्वात मोठी मुर्ती कुठे आहे?

अनेकांना वाटत असेल की भगवान विष्णुची सर्वात मोठी भारतात आहे. पण तुम्हाला ही गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की भगवान विष्णुची सर्वात मोठी मुर्ती भारतात नाही, तर एक मुस्लिम इंडोनेशियामध्ये आहे.

इंडोनेशियामध्ये तुम्हाला भारतापेक्षा जास्त हिंदूत्व दिसून येते. इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकांची संख्या आहे. इंडोनेशिया मुस्लिम लोकसंख्येत जगभरातल्या पहिल्या क्रमाकांचा देश आहे, पण तरीही इथल्या लोकांमध्ये हिंदूत्व दिसून येते.

इतकेच नाही, तर या देशातील एअरलाईन्सचे नाव पण गरुडा एअरलाईन आहे. भगवान विष्णुची स्वारी गरुड आहे, त्यामुळेच या एअरलाईनचे नाव गरुडा एअरलाईन ठेवण्यात आले आहे. इथेच एका बेटावर भगवान विष्णुची सर्वात मोठी मुर्ती आहे.

या मुर्तीला स्टॅच्यु ऑफ गरुडा नावाने पण ओळखले जाते. ही मुर्ती इतकी मोठी आणि उंच आहे, की बघतानाही आश्चर्य वाटते. या मुर्तीला बनवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च झालेले आहे. ही मुर्ती तयार करण्यासाठी तांबे आणि पितळाचा वापर केला आहे.

भगवान विष्णुची मुर्ती १२२ फुट उंच आणि ६४ फुट रुंद आहे. या मुर्तीला २-४ वर्षे नाही, तर तब्बल २४ वर्षे लागलेले आहे. २०१८ साली ही मुर्ती बनून तयार झाली होती. आता या मुर्तीला बघण्यासाठी देशभरातून लोक येतात.

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या दिशा पटानीच्या लव्ह स्टोरीबद्दल; टायगरच्या अगोदर टेलिव्हिजन अभिनेत्याला करत होती डेट
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी करत होती ही प्रसिद्ध अभिनेत्री; पोलिसांच्या छापेमारीत अटक
सोलापूरमध्ये अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण २४ तासांत होतोय बरा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.