लोकेश राहुल- अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या रंगल्या चर्चा, फोटो होतोय व्हायरल

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू लोकेश राहुलने गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर केले आहेत. यामुळे लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या पुन्हा चर्चा रंगल्या आहेत. हा फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

क्रिकेट विश्वात खेळाडूंच्या प्रेम प्रकरणावर त्याच्या चाहत्यांचे लक्ष असते. के. एल. राहुलने अथिया शेट्टीच्या वाढदिवसाला खास फोटो शेअर एक आपल प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

अथिया शेट्टीने २८ व्या वर्षात पदार्पण करत वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त लोकेश राहुलने अथियासोबतचा खास फोटो शेअर केला. यासोबत ‘हॅप्पी बर्थडे मॅड बच्ची’ अशी कॅप्शन देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

लोकेश राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या प्रेमाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. परंतु दोघांनी अद्याप आपले प्रेम उघडपणे जाहीर केलेले नाही. मात्र, गुगल सर्च इंजिनला के एल राहुलची पत्नी सर्च केले असता अथिया शेट्टीचे नाव समोर येते. त्यामुळे त्या दोघांच्या प्रेमाच्या चर्चेत भर पडली आहे.

भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या, विराट कोहली, युवराज सिंग, यांची प्रेम प्रकरणे मोठी गाजली. त्यांचा चाहता वर्ग देखील खुप मोठा आहे. यामुळे यामुळे आता राहुलची देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.