मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबले नसते; तर मयुरसह त्या मुलाचाही गेला असता जीव; वाचा पडद्यामागची कहाणी

बदलापुर | वांगणी रेल्वे स्टेशनवर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावत जावून एका चिमुकल्याचा जीव  पाँईंटमन मयुर शेळकेने वाचवला होता. धाडस करत भरधाव वेगात असलेल्या रेल्वेसमोर जाऊन ६ वर्षाच्या चिमुकल्याचा जीव वाचवल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

अनेक राजकीय नेत्यांनी, सोशल मिडिया युजर्सनी मयुरचे कौतूक केले होते. मयुरच्या धाडसाचे राज्यात नाही तर संपुर्ण देशभरात कौतूक होत आहे. मयुरचा रेल्वे मंत्रालयातर्फे ५० हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. तसेच जावा कंपनीकडूनही शानदार मोटरसायकल देण्यात आली आहे.

एकीकडे सगळीकडे मयुरचं कौतूक होत आहे. तर दुसरीकडे ज्या रेल्वे समोर मयुरने पळत जाऊन जीव वाचवला त्या उद्यान एक्सप्रेसच्या लोको पायलटचं कौतूक होताना दिसून येत नाही. जर त्यांनी जर प्रसंगावधान राखलं नसतं. तर त्यादिवशी मोठी घटना घडली असती.

विनोद जांगिड हे रेल्वे विभागात लोको पायलट म्हणून काम करतात. त्या दिवशी त्यांच्यावर उद्यान एक्सप्रेस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. रेल्वे मुंबईच्या दिशेने घेऊन येत असताना वांगणी रेल्वे स्टेशन लागतं.

स्टेशनच्या आधी एक वळण असल्याने वांगणी स्टेशन पायलटला दिसत नाही. रेल्वेने वळण पुर्ण केल्यानंतर लोको पायलट विनोद यांना एक लहान मुलगा ट्रॅकवर असल्याचं दिसलं आणि एक महिला त्या मुलाला शोधत आहे. तसेच त्या लहान मुलाचा जीव वाचवण्यासाठी एक तरूण समोरून पळत येत असल्याचं  दिसलं.

विनोद यांनी लगेच इमर्जन्सी ब्रेक दाबला. त्यामुळे १०५ किलोमीटर प्रतितास वेगात असणारी रेल्वे दोन सेकंदात ८० ते ८५ किलोमीटर प्रतितास वेगावर आली. यामुळे चिमुकल्याला वाचवण्यासाठी धावणाऱ्या पॉईंटमन मयुरला याचा फायदा झाला. मयुरचे हे शौर्य पाहून लोको पायलटनेही त्याचं कौतूक केलं आहे. मयुरला आमचा सलाम आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं या घडलं होतं…

रेल्वे स्थानकावर एक महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन रेल्व ट्रॅकच्या कडेने चालली होती. तेवढ्यात मुलगा रेल्वे रुळावर पडतो. महिलेला डोळ्यांनी दिसत नव्हते. मुलाला वाचवण्यासाठी ती मोठमोठ्याने ओरडत होती.

मुलगा सुध्दा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. तेवढ्यात भरधाव वेगात रेल्वे आली. त्या ठिकाणी  कर्तव्य बजावत असलेले कर्मचारी मयुर शेळके यांना मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडला असल्याचं दिसलं आणि त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी जोरात धाव घेतली आणि त्या मुलाचा जीव वाचवला.

महत्वाच्या बातम्या-
क्रूरतेचा कळस! गर्भवती वाघीणीला जिवंत जाळले; वाघीनीच्या पोटात होती चार पिल्ले
कोल्हापुरातील हे मुस्लिम कुटुंबीय पुरणपोळी आणि कटाच्या आमटीवर सोडतात रोजाचा उपवास
कुटुंब कोरोनाविरूद्ध लढा देतयं, मी त्यांच्यासोबत राहीलं पाहीजे; म्हणत अश्विनने सोडली आयपीएल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.