कोरोनाचे नियम मोडले म्हणून सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसमोर झाडल्या गोळ्या

सध्या पूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांत निर्बंध लावण्यात आले आहेत आणि कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. याचदरम्यान उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग पुन्हा चर्चेत आले आहेत.

कारण त्यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रसार जास्त होऊ नये म्हणून कडक निर्बंध लावले आहेत. जो हे नियम मोडेल त्यांना कठोर शिक्षा केली जात आहे. असंच एकाने नियम मोडले ते त्याला थेट मृत्युदंड देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियात किम जोंग यांनी घालून दिलेले नियम मोडल्याने एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग यांनी त्याला मृत्युदंड दिला आहे. या व्यक्तीला फायरिंग स्क्वाडच्या हाती देण्यात आले आणि सार्वजनिक ठिकाणी त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

एवढच नाही किम जोंग यांनी जनतेमध्ये भितीचे वातावरण तयार व्हावे म्हणून अँटी एअरक्राफ्ट बंदुका तैनात केल्या आहेत. त्या बंदुकीद्वारे एक किलोमीटरपर्यंत कोणालाही गोळ्या घालता येतात.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार २८ नोव्हेंबरला एका व्यक्तीला कोरोनाचे नियम न पाळल्याने मृत्युदंड देण्यात आला. नियम मोडत त्या व्यक्तीने चिनी सामानाची तस्करी केली होती असा आरोप त्याच्यावर होता.

महत्वाच्या बातम्या

युट्युबरने प्रेग्नेंट प्रेयसीला थंडीत विना कपड्यांचे बाल्कनीत बसवले, त्यानंतर जो प्रकार घडला…

धोनीची नवीन योजना! शेतकऱ्यांना देणार मोफत गाई, जाणून घ्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.